तरुण भारत

हवा प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत उभारला स्मॉग टॉवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

भारताची राजधानी दिल्ली हवेच्या प्रदुषणामुळे नेहमीच चर्चेत असते. दिल्लीतील हवा, खालावणारी भुजल पातळी, यामुळे नागरिकांसोबत लहाण मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. यावर दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार विविध उपायांचा शोध घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता दिल्लीत देशातील पहिल्या स्मॉग टॉवरची उभारणी करण्यात येणार आहे.

दिल्ली शहर आणि परिसराला प्रदुषणाने विळखा घातला आहे. यासाठीच केजरीवाल यांनी स्मॉग टॉवर उभारला असून नुकतेच त्याचे उद्घाटन केले. दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील बाबा खडक सिंह मार्गावर या स्मॉग टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या टॉवरमुळे दिल्लीत प्रदूषण कमी होण्यास तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. हा टॉवर प्रदूषित हवा आत घेणार असून स्वच्छ हवा बाहेर सोडणार आहे. या टॉवरमध्ये साधारणपणे १ चौरस किलोमीटर क्षेत्रातील प्रदूषित हवा खेचण्याची क्षमता आहे. तर स्वच्छ हवा १० मीटर उंचीवर सोडणार आहे.ऑक्टोबर २०२० मध्ये मंजूर झालेल्या या योजनेची कार्यक्षमता पाहण्यासाठी पुढील दोन वर्षे निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत. टॉवरची कार्यक्षमता आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईच्या माध्यमातून तपासली जाणार आहे. त्यानंतर दिल्लीच्या इतर भागात स्मॉग टॉवर उभारावेत की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

दरम्यान, दिल्तील हवा प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. यापूर्वी, शहरात सम – विषम धोरणानुसार वाहनांना फिरण्यास परवानगी देण्यात आली होती. तर शेजारी पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांना गव्हाचे सड जाळण्यास निर्बंध घालण्यात आले होते.

Advertisements

Related Stories

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर

Patil_p

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत

Abhijeet Shinde

भारतातही ‘फायझर’चा आपत्कालीन वापर शक्य

Patil_p

कोरोनाची धास्ती : पाँडिचेरीमध्ये वाढवला 3 मे पर्यंत कर्फ्यू

Rohan_P

सणांच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

अरुणाचल प्रदेशमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी ‘ॲप्स’

prashant_c
error: Content is protected !!