तरुण भारत

फुलांच्या राख्या आणि शहाळ्यांनी सजले दत्तमंदिर

ऑनलाईन टीम / पुणे :

गुलाब, झेंडूसह विविध फुलांनी साकारलेल्या भव्य राख्या आणि शहाळयांची आकर्षक आरास करुन लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर सजविण्यात आले. राखीपौर्णिमा, नारळीपौर्णिमा आणि श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात केवळ ब्रह्मवृंद व विश्वस्तांच्या उपस्थितीत दत्तयाग, रुद्रयाग यांसारखे धार्मिक विधी पार पडले. 

Advertisements


बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२४ व्या वर्षी फुलांची राखी, शहाळ्यांची आकर्षक आरास व धार्मिक विधी मंदिरात आयोजित करण्यात आले होते. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. 


नारळीपौर्णिमा व राखीपौर्णिमेनिमित्त चंद्रकांत भोंडे यांच्या हस्ते रविवारी दत्तयाग पार पडला. तर, श्रावणी सोमवारनिमित्त ट्रस्टचे विश्वस्त युवराज गाडवे, सुप्रिया गाडवे, अनुष्का गाडवे, अथर्व गाडवे यांच्या हस्ते रुद्रयाग झाला. अमोल मुळ्ये गुरुजी व ब्रह्मवृंदांनी याचे पौरोहित्य केले. संपूर्ण मानवजातीवरचे कोरोना संकट त्वरीत नष्ट होऊन जग भयमुक्त होऊ दे, अशी प्रार्थना श्री दत्त महाराजांचरणी करण्यात आली.

Related Stories

दगडूशेठ मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची कायमस्वरुपी स्थापना

prashant_c

लायन्स क्लबच्या वतीने तिन्ही दलांच्या सैनिकांसमवेत राखीपौर्णिमा साजरी

Rohan_P

जुन्या रुग्णवाहिकांचे सुंदर घरात रुपांतर

Amit Kulkarni

दिग्गज आणि तरुणाईने केले ‘वंचितांचे बोरन्हाण’

prashant_c

अनेकदा रंग बदलणारे सरोवर

Patil_p

गुगलकडून ‘कोरोना वॉरियर्स’ साठी खास डुडल

prashant_c
error: Content is protected !!