तरुण भारत

सांगली : बेडगेत डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार

संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

मिरज तालुक्यातील बेडग येथे मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरची पाठीमागून धडक बसल्याने मुक्ताबाई नामदेव जाधव (वय ५५) ही महिला जागीच ठार झाली. बेडग गावच्या हद्दीत मिरज-बेडग रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेच्या समोर सोमवारी दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केली. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणारे डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्या जात असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

मुक्ताबाई जाधव या त्यांचा मुलगा सुधाकर जाधव याच्या सोबत कोरोनाची लस घेण्यासाठी बेडग येथील जिल्हा परिषद शाळेत आल्या होत्या. लस घेतल्यानंतर मोटार सायकल (एम. एच. १० सी एल २२३१) वरून घरी जात असताना जिल्हा परिषद शाळेसमोर थांबल्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेला डंपर (एम. एच. १० सी आर ६५९४) ने धडक दिली. या अपघातात मुक्ताबाई जाधव या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून काचांवर दगडफेक केली. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आलेले डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पळवले जात असल्याचा आरोप यावेळी जमावाने केला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Related Stories

सांगली : पोलिसांनी ‘जनता कर्फ्यू’ घेतला हातात

Abhijeet Shinde

कडेगाव तालुक्यात कर्तव्यदक्ष पोलिसिंगमुळे कोरोना हद्दपारीच्या उंबरठ्यावर

Abhijeet Shinde

सांगली : शिराळा येथील भूईकोट किल्ल्याची खा. धैर्यशील मानेंनी केली पाहणी

Abhijeet Shinde

सांगली : अँटिजेनमध्ये मनपाचे तीन कर्मचारी पॉझिटिव्ह, ५८ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

सांगली : ढवळी आणि एरंडोलीत ऊसतोड मजुराच्या झोपड्यामध्ये चोरी

Abhijeet Shinde

परदेश शिष्यवृत्तीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!