तरुण भारत

संस्कृत दिनानिमित्त लघुचित्रपट उत्सव

29 लघुपटांचा सहभाग : आजच्या काळातील समस्यांवर भाष्य

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

संस्कृत भाषा आधुनिक आकर्षक पद्धतीने सर्व लोकांपर्यंत पोचविली पाहिजे. त्यासाठी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (लघुचित्रपट उत्सव) सारखे उपक्रम लाभदायक ठरतील. देशातील विविध भागातील तरुण यात सहभागी झाले हे संस्कृत भाषेच्या भाग्योदयाचे लक्षण आहे, असे उद्गार अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी नाशिक येथे `संस्कृत भारती’ने आयोजित केलेल्या लघुचित्रपट उत्सवात काढले. जम्मू काश्मीर, बंगाल, तमिळनाडु अशा 11 राज्यातील 29 लघुपट या उत्सवात सहभागी झाले. त्यापैकी उत्तम अशा 10 लघुपटांचे प्रदर्शन या निमित्ताने करण्यात आले. कोरोनाच्या करोना निर्बंधांमुळे निवडक अशा 30 व्यक्तींच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला.

संस्कृत ही मनोरंजनाची भाषा दीर्घकाळापासून आहे. म्हणूनच उत्तम अशी नाटके संस्कृत मधून लिहिली गेली. आधुनिक संगणक युगात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हा उत्सव सर्व जगभर प्रसारित करण्यात येत आहे. संस्कृत भाषेला लोकप्रिय करण्याचे हे आव्हान आजच्या युवकानी स्वीकारले पाहिजे, असे आवाहन `संस्कृत भारती’चे अखिल भारतीय प्रचारप्रमुख शिरीष भेडसगावकर यानी केले.

या सर्व लघु चित्रपटात आजच्या काळातील समस्या मांडल्या आहेत. भटक्या विमुक्त, बहुरुपी लोकांच्या, कोरोना काळातील पीडीतांच्या, बेरोजगार तरुणांच्या अशा विविध समस्या हाताळल्या आहेत. साधी सोपी संस्कृत भाषा वापरली आहे. त्यामुळे कुणीही सहजगत्या आशय समजू शकतो, अशी माहिती शीतल महाजनी यांनी दिली. यू टÎूब च्या https://www.youtube.com/watch?v=bnic2q-88bU या लिंकवर हा उपक्रम आपणास पहाता येईल.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांनाच कौल

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठात नॅक’ समितीने साधला विविध घटकांशी संवाद

Abhijeet Shinde

शिरोळ शहर पुन्हा चार दिवस बंद नागरिक खरेदीसाठी एकच गर्दी प्रशासन हतबल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मावस भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अतिप्रसंग

Abhijeet Shinde

जरळीला विवाहित महिलेचा खून

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आता शेतकर्‍यांना मिळणार बांधावरच धडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!