तरुण भारत

भारतीय स्टार्टअप्स्नी उभारले 6.5 अब्ज डॉलर्स

रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसीचा समावेश

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisements

2021 च्या एप्रिल ते जूनच्या तिमाहीदरम्यान भारतीय स्टार्टअप्स्नी 6.5 अब्ज डॉलर्सची उभारणी केली असून या दरम्यान 11 नव्या युनिकॉर्न कंपन्या स्थापित झाल्या आहेत.

नॅसकॉम-पीजीए लॅब्ज यांच्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. दुसऱया तिमाहीत 160 निधी गुंतवणुकीचे व्यवहार पार पडले असून जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत

 यात 2 टक्के वाढ दर्शवली गेली आहे. 2021 च्या दुसऱया तिमाहीत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे दिसून आले असून याच दरम्यान सर्वाधिक युनिकॉर्न कंपन्यांची नोंदणीही झाली आहे. जून 2021 पर्यंत एकंदर युनिकॉर्नची संख्या 53 वर पोहोचली आहे.

दुसऱया तिमाहीत आर्थिक व्यवहार वेगाने होताना दिसले. बाजारात सकारात्मक वातावरण वाढले आहे. दुसऱया तिमाहीत 6.5 अब्ज डॉलर्सची उभारणी करण्यात आली असून मागच्या तिमाहीच्या आधारावर पाहता 72 टक्के घसघशीत वाढ नोंदली गेली आहे.

कोणी किती रक्कम

उभारली पाहूया

दशलक्ष डॉलर्स

स्विगी……… 800

शेअरचॅट…… 502

बायजू……… 340

फार्मइझी….. 323

मिशो………. 300

पाईन लॅब्ज.. 284

डेल्हीवरी….. 277

झेटा……….. 250

पेड…………. 215

अर्बन कंपनी      188

Related Stories

अर्थव्यवस्थेत चालू वर्षात 0.5 टक्क्मयांची घसरण शक्मय

Patil_p

होम फर्स्टचा आज आयपीओ बाजारात

Patil_p

महिंद्राने 29,878 पिकअप वाहने परत मागवली

Patil_p

बँकांसमोर आता टेक कंपन्यांचे आव्हान

Patil_p

डिसेंबर तिमाहीत येस बँकेला 18,564 कोटी रुपयाचा तोटा

tarunbharat

मुख्य कंपन्यांच्या बाजारीमूल्यात 92,130.59 कोटीने वाढ

Patil_p
error: Content is protected !!