तरुण भारत

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट

लहान मुलांना सर्वाधिक धोका – गृह विभागाचा इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा धोका नीती आयोगाने व्यक्त केल्यानंतर आता देशाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱया नॅशनल इन्स्टिय़टय़ूट ऑफ डिझास्?टर मॅनेजमेंटच्या तज्ञांनी देखील एक चिंताजनक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता वर्तवली आहे. या तिसऱया लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचेही नमूद करण्यात आले असून आतापासून आरोग्य विभागाने सतर्कतेची पूर्वतयारी सुरू करावी, असे म्हटले आहे.

तिसऱया लाटेसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ञांच्या समितीने महत्त्वाचा इशारा दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट विक्राळ रुप धारण करु शकते, असा इशारा या समितीकडून देण्यात आला आहे. तिसऱया लाटेत लहान मुले मोठय़ा संख्येने कोरोना संक्रमित झाली तर त्यांच्यासाठी बाल सुविधा सेवा केंद्रे, तज्ञ डॉक्टर, मेडिकल स्?टाफ, व्हेंटिलेटर आणि ऍम्ब्युलन्स अशा सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्या लागणार असल्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आला आहे. तसेच या अहवालात सहव्याधी असलेल्या तसेच दिव्यांग असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचनाही करण्यात आली आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही कोरोनाची तिसरी लाट ही ऑक्टोबर अखेरपर्यंत येण्याची शक्मयता असल्याचेही या समितीकडून सांगण्यात आले आहे.

आतापासूनच पूर्वतयारीची गरज

कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱया लाटेहून अधिक भयावह असेल, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लहान मुलांना ज्या प्रमाणात कोरोनाची लागण होऊ शकते, त्या प्रमाणात आपल्याकडे भारतात पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आतापासून विविध सुविधा उपलब्ध करण्याची पूर्वतयारी करावी लागेल, असा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवण्यात आलेला आहे.

नीती आयोगाकडून महत्त्वाची सूचना

देशात पुढच्या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे नीती आयोगाचे म्हणणे आहे. तिसऱया लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने यंत्रणेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत.

बूस्टर डोसचा विचार नाही- नीती आयोग

कोविड 19 लसीसाठी बूस्टर डोसचा विचार अद्याप केंद्र सरकारने केला नसल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. बूस्टर डोसची वेळ आणि आवश्यकता यामागील संशोधन अजूनही विकसित होत आहे. लसनिर्मिती करणाऱया कंपन्यांनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे आहे. अजूनही तज्ञांकडून अभ्यास सुरू असल्याचे पॉल यांनी स्पष्ट केले आहे. जगातील काही देश बूस्टर डोसचे नियोजन करत असले तरी जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याला सहमती दर्शवलेली नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Related Stories

लॉकडाउन विरोधात युरोपमध्ये निदर्शने

Patil_p

अत्तर व्यापाऱ्याच्या घरी नोटांचाच ‘सुगंध’

Patil_p

काँग्रेस आमदारासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

Patil_p

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

Amit Kulkarni

राम मंदिरासाठी सोन्या-चांदीचा मोठा ओघ

Patil_p

केरळात प्रवासी रेल्वेत सापडली स्फोटके

Patil_p
error: Content is protected !!