तरुण भारत

फेडरेशनला उच्चस्तरावर नेण्यासाठी ग्राहकांनी साथ द्यावी

सेल्फ हेल्प ग्रुप संघटना अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांचे आवाहन

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोवा मार्केटिंग फेडरेशन राज्यात उत्तमरित्या कार्य करत आहे. कार्पोरेट स्तरावर फेडरेशन विचार करत असताना फेडरेशन आणखी उंचावर जाण्यासाठी ग्राहकांनी फेडरेशनला साथ देणे आवश्यक आहे. स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत केली पाहिजे असे प्रतिपादन गोवा सेल्फ हेल्प ग्रुप संघटनेच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनी केले. गोवा मार्केटिंग फेडरेशन संचालित गोवा सहकार भंडारतर्फे आयोजित केलेल्या ’गणेश चतुर्थी धमाका’ या भेट कुपन योजनेच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष सखा मळीक, उपाध्यक्ष प्रेमानंद चावडीकर आणि व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुलक्षणा सावंत यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

गोवा मार्केटींग फेडरेशनमध्ये सुमारे 250 कामगार कार्य करतात. कोरोना काळात 18 महिने फेडरेशनने उत्तमरित्या कार्य केले आहे. सामान्यांसाठी गणेश चतुथीनिर्मित 23 रोजीपासून सुरू झाली असून 23 सप्टेंबरपर्यंत ही योजना कार्यरत राहणार आहे असे सावंत म्हणाल्या.

यंदा गोवा मार्केटिंग फेडरेशन 56 वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सहकार भंडारतर्फे चतुर्थी आणि नाताळ या सणांच्या वेळी भेटकुपन योजना राबविण्यात येतात. त्यांना प्रत्येक वेळी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. परंतु गतवर्षी कोरोना महामारीमुळे सहकार भंडारचे सर्व व्यवहारच ठप्प झाले होते. त्यामुळे या योजनेलाही म्हणावा तेवढा प्रतिसाद लाभला नव्हता. परंतु कोरोना काळात फेडरेशनच्या कर्मचाऱयांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. सहकार भांडारमध्ये सुमारे 80 टक्के महिला कर्मचारी आहेत. तरीही त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिली. आपल्या जीवाची पर्वा न करता बसमधून दूरचा प्रवास करून ग्राहकांना सेवा दिली असे अध्यक्ष सखा मळीक यांनी सांगितले.

 यंदा गोवा मार्केटिंग फेडरेशन 56 व्या वर्षात पदार्पण करत आहे. ग्राहकांच्या आशीर्वादामुळेच मार्केटिंग फेडरेशनला यश मिळत आहे. तसेच सध्या गोवामुक्तीची 60 वर्षपूर्ती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने फेडरेशनला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सहकार्य करावे असे फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रेमानंद चावडीकर म्हणाले.

Related Stories

खाण लीज गौडबंगाल प्रकरणी सरकारला नोटीस

Omkar B

आमदार प्रसाद गावकर तृणमूलमध्ये

Amit Kulkarni

दोन आयपीएस अधिकाऱयांना बढती

Patil_p

बेकायदा गुरांची कत्तलप्रकरणी तिघांना अटक

Omkar B

कोडार-खांडेपार नदी पात्रात बिगरगोमंतकीयांच्या सहलीत वाढ

Amit Kulkarni

चोरीप्रकरणातून चौघेही दोषमुक्त

Patil_p
error: Content is protected !!