तरुण भारत

नोकरीसाठी पैसे घेणाऱया आमदारांची न्यायालयाने दखल घ्यावी

जॉन नाझारेथ यांची मागणी

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी एका प्रचारादरम्यान दुसऱया आमदाराप्रमाणे नोकरीसाठी पैसे घेत नाही असे विधान केले होते. यावरून भाजप सरकारमधील आमदार नोकरीसाठी गोमंतकीयांकडून पैसे घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने या गोष्टीची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सहसरचिटणीस जॉन नाझारेथ यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 20 जून रोजी एका कार्यक्रमानंतर विधान केले हेते की सरकारी खात्यांमध्ये नोकरी देण्यासाठी माझ्या नावे पैसे घेतले जातात. या विधानावरून नोकरीचा भ्रष्टाचार भाजप सरकारमध्ये होत असल्याचे सिद्ध होते. भाजप पक्ष हा भ्रष्टाचारी जनता पक्ष आहे. तेव्हा मतदारांनी योग्य विचार करूनच योग्य पक्षाला मत द्यावे असे नाझारेथ यांनी सांगितले. जेव्हा सरकार दहा हजार नोकरी उपलब्ध करण्याची घोषणा करते तेव्हा या नोकऱया विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूकपर्यंत गोमंतकीयांना रोजगार, नोकरी न देणे हे भाजपाचे कट कारस्थान आहे असा आरोप नाझारेथ यांनी केला.

Related Stories

डिचोली बाजारात ग्राहकांच्या सोयीसाठी चोख बंदोबस्त

Patil_p

मोहम्मेडन स्पोर्टिंग डय़ुरँड चषक फुटबॉलच्या अंतिम फेरीत दाखल

Amit Kulkarni

‘बॅटल ऑन शिप’साठी विजेंदर-लॉप्सन पणजीत दाखल

Amit Kulkarni

दुःखद संकट असतानाही आरोग्यमंत्र्यांचा संधीसाधूपणा

Patil_p

पिछाडीवरून एफसी गोवाने साधली केरळ ब्लास्टर्सशी बरोबरी

Amit Kulkarni

विजेचे ‘आरएमयू’ स्वप्न साकारु शकलो नाही

Patil_p
error: Content is protected !!