तरुण भारत

अपूर्व चंद्रांनी माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली\ ऑनलाईन टीम

अपूर्व चंद्रा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. याआधी अपूर्व चंद्रा यांनी १ ऑक्टोबरपासून कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव म्हणून सप्टेंबर २०२० मध्ये संसदेने मंजूर केलेल्या कामगार संहितेच्या त्वरित अंमलबजावणीच्या आदेशावर काम केले आहे. चारही कामगार संहितांवर सर्व संबंधितांशी सविस्तर सल्लामसलत करून नियम तयार करण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. नियमित पगार क्षेत्रातील ७८.५ लाख कामगारांना रोजगार संधी पुरवण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरु करण्यात आली.

अपूर्व चंद्रा यांनी संरक्षण मंत्रालयात संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी पार पाडली आहे. ह्या कारकिर्दीत त्यांनी शस्त्रास्त्रांच्या अधिग्रहणाची प्रक्रिया व्यवस्थित राबवत लष्कराला बळकटी आणण्याची कामगिरी पार पाडली होती.

Related Stories

पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविडचा शेरा नसणार : उदय सामंत

Rohan_P

उत्तराखंडातील कोरोना कर्फ्यूमध्ये 9 जूनपर्यंत वाढ!

Rohan_P

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

tarunbharat

सचिन वाझेंना हृदयविकाराचा त्रास; खासगी रूग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

Rohan_P

दिवाळीनंतर 3 मंत्री आणि त्यांच्या जावयांचे फटाके फोडणार

datta jadhav

जबाबदार कोण? .. म्हणत प्रियांका गांधींनी मोदींना विचारले तीन प्रश्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!