तरुण भारत

महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’चे 27 नवे रूग्ण; एकूण रूग्णसंख्या 103 वर

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रूग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात घट होत असली तरी राज्यातील डेल्टा प्लस विषाणूची वाढती संख्या चिंताजनक आहे. मागील 24 तासात राज्यात 27 नव्या रुग्णांची नोंद झाली असून डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या आता 103 वर पोहचली आहे.

Advertisements

नव्याने आढळलेल्या 27 रुग्णांमध्ये नागपूर येथील 5, नगर 4, आमरावती, गडचिरोली प्रत्येकी 6, नाशिक 2, यवतमाळ 3 आणि भंडारा येथे एका रूग्णाचा समावेश आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्याच चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 188 रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 128 रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे 2, केपा प्रकाराचे 24 तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईकरांसाठी ही बाब काहीशी चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची कडक पालन करावे असे आवाहन केले आहे.

डेल्टा प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड-19 विषाणू प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

चिंता वाढली : महाराष्ट्रात 3827 नवे कोरोना रुग्ण; 142 मृत्यू

Rohan_P

… तरच निर्बंध आणखी शिथील करणार : अजित पवार

Rohan_P

कामगाराच्या वादातून गंवडय़ासह कुटुंबास मारहाण

Patil_p

सातारा, कोल्हापूर येथील 167 बंदीवानांना तात्पुरता जामीन मंजूर

Patil_p

पेट्रोल परवडतय मग दूध का नाही?

Patil_p

कोल्हापूर : हुपरीत कोरोनाचा पाचवा बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!