तरुण भारत

सोपोरमध्ये चकमक; मोबाईल इंटरनेटसह रेल्वे सेवा स्थगित

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. या ठिकाणी आणखी एक ते दोन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. दरम्यान, परिसरात कोणत्याही अफवा पसरू नये, यासाठी सोपोरमधील मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीनगर-बारामुल्ला दरम्यानची रेल्वे सेवा ही बंद करण्यात आली आहे.

Advertisements

सोपोरच्या पेठसीर गावात दहशतवादी लपल्याची माहिती  गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानुसार जम्मू पोलीस, लष्कराच्या 52-आरआर आणि सीआरपीएफच्या 177,279 आणि 92 बटालियनच्या संयुक्त पथकाने या भागाला वेढा देऊन शोध मोहीम सुरू केली. वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख द्या पटली नसून, या भागात शोध मोहीम सुरू आहे.

Related Stories

स्वदेशी युद्धनौकेमुळे वाढणार भारताची ताकद

Amit Kulkarni

अकाली दलासोबत आघाडीस भाजपचा नकार

Patil_p

गैरवर्तवणूक भोवली; राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन

datta jadhav

हैदराबादमध्ये पावसाचा कहर

Patil_p

शेतकरी संघटनांची आता पुढील संघर्षावर खलबते

Patil_p

गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!