तरुण भारत

कोल्हापूर : ‘पंचगंगेत’ फेकलेल्या ‘त्या’ बालिकेचा मिळाला मृतदेह

निर्दयी सावत्र बाप अटकेत, नगरपालिकेच्या रेस्क्यु पथकाच्या मृतदेह शोधण्यास यश
नदीत फेकून दिलेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला बालिकेचा मृतदेह

राजेंद्र होळकर / इचलकरंजी

Advertisements

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत फेकून दिलेल्या यळगुड (ता. हातकणंगले) येथील नऊ वर्षाच्या बालिकेचा मृतदेह मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेच्या रेस्क्यु पथकाच्या मदतीने शोध काढला. कु. प्रणाली युवराज साळोखे असे मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी सावत्र बाप युवराज आत्माराम साळोखे (रा. यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

संशयीत आरोपी युवराज साळोखे याचे दोन विवाह झाले असून, दोन्ही पत्नींना अपत्य होत नसल्याच्या कारणावरुन सोडचिट्टी दिली आहे. याचदरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी त्याने इचलकरंजीमधील एका घटस्फोटीत महिलेशी तिसरा विवाह केला. विवाह वेळी त्यांने संबंधीत महिलेच्या पहिल्या पतीच्या प्रणाली या बालिकेचाही स्विकार केला. पण तिसरा विवाह केलेल्या पत्नीला दिवस गेल्याने कु. प्रणालीचा साभाळ करण्यावरुन या दाम्पत्याच्यामध्ये वाद सुरु झाला. या वादातून संशयीत आरोपी युवराज साळोखेने तिचा कायमचा अडसर काढण्याचा निर्णय घेतला.

रविवारी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपहत बालिका घराशेजारी एकटीच खेळत होती. या बालिकेने संशयीत आरोपी दुचाकीवरुन घराकडे येत असताना बाबा म्हणून हाक मारली. ही हाक ऐकून त्याने दुचाकी थांबविली. शेजारी इकडे-तिकडे पाहिले तर कोणी नसल्याचे दिसून येताच कु. प्रणालीचे अपहरण केले. त्याने सरळ यळगुडहून रेंदाळ, जंगमवाडी मार्गे खचनाळ (ता. निपाणी) गावाशेजारील ओसाड माळरानावर आला. या ठिकाणी त्याने अंधारारात्रीत प्रणालीला बेवारस स्थितीत सोडून देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी ती रडू लागल्याने पुन्हा त्या बालिकेला दुचाकीवर बसवून रांगोळी मार्गे शहरालगतच्या पंचगंगा घाटावर आला. या ठिकाणी अंधाराचा गैरफायदा घेवून प्रणालीला नदीपात्रात फेकून दिले.

या घडल्याप्रकारानंतर तो घरी आला. त्यावेळी त्याला पत्नीने मुलगी प्रणाली बेपत्ता झाल्याबाबतची माहिती दिली. त्यावरुन त्याने घराच्या परिसरात मुलीचा शोध घेण्याचे नाट्य केले. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हुपरी पोलिसात कु. प्रणालीचे अज्ञाने अपहरण केल्याबाबतची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हा दाखल करुन, अपहत बालिकेचे त्वरीत शोध सुरु केला. याचदरम्यान पोलिसांनी सोमवारी पहाटे संशियताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी सुरु केली.

चौकशीदरम्यान त्याने अपहत बालिका कु. प्रणालीला खचनाळ (ता. निपाणी) गावालगतच्या ओसाड माळावर सोडून दिल्याची माहिती दिली. ही हद्द शहरातील शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने पोलीस निरीक्षक मस्केनी संशयीत आरोपी युवराज साळोखेला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अपहत बालिकेला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची माहिती दिली. या माहितीवरुन पोलिसांनी दुपारपासून येथील पंचगंगा नदीत संबंधीत बालिकेचा शोध सुरु केला. पण सांयकाळी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

मंगळवारी सकाळी पोलिसांनी नगरपालिकेचे आपत्तीव्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे यांच्या रेस्क्यु पथकाच्या मदतीने पोलिसांनी कु. प्रणालीचा पंचगंगा नदीत शोध सुरु केला. या रेस्क्यु पथकाला तब्बल दिडतासाच्या अथक प्रयत्नानंतर बालिकेचा मृतदेह शोधण्यास यश आले. पोलिसांना मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. तपासी पोलीस अधिकार्यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली असून, पोलिसांनी बालिकेच्या खून प्रकरणी निर्दयी बाप युवराज साळोखेला अटक केली आहे.

Related Stories

दिल्ली विकासाचे मॉडेल कोल्हापुरात राबवणार : दुर्गेश पाठक

triratna

वाढीव वीज बिल कमी करा : शेतकरी विकास समितीची मागणी

triratna

इचलकरंजीत वर्चस्व वादातून युवकावर खूनी हल्ला

triratna

१८ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादीच नाही

triratna

सिमाभागातील विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारी पासून शैक्षणिक संकुल

triratna

कोल्हापूर : कुंभोजची ‘अंगणवाडी क्रमांक ७६’ची सुंदर सुसज्ज, बोलकी इमारत तयार

triratna
error: Content is protected !!