तरुण भारत

ओवळीये मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

ओवळीये गावातील युवकांचा उपक्रम


ओटवणे / प्रतिनिधी:

Advertisements


ओवळीये मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सध्या मोठया प्रमाणात झाडी – झुडपे वाढल्याने याचा फटका वाहनचालकांसह पादचार्‍यांना बसत आहे. त्यामुळे ओवळीये गावातील युवकांनी एकत्र येत गावातील या मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई केली. युवकांच्या या उपक्रमाचे ओवळीये परिसरातून कौतुक होत आहे. ओवळीये गावात जाणारा हा रस्ता मूळात अरुंद असून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अनेक वेळा या रस्त्यावर लहानसहान अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या रस्त्याची श्रमदानातून साफसफाई करण्याचे युवकांनी ठरविले. यावेळी रस्त्याच्या साईडपट्टी भागाचीही स्वछता करण्यात आली. गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या दुर्लक्षित रस्त्याची साफसफाई केल्याबद्दल वाहन चालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी गावातील हनुमंत सावंत, महादेव देसाई, अजित सावंत, सरस्वती देसाई यांनी या श्रमदान दरम्यान युवकांना अल्पोपहाराची सोय केली. यावेळी ओवळीये उपसरपंच सागर सावंत, ग्रामपंचायत सदस्य मनोज सावंत, शिवराम सावंत, प्रदीप सावंत, सुधीर नाईक, प्रमोद सावंत, रोहन सावंत, प्रशांत सावंत, मनोज सावंत, सुरज राऊळ, सूरज सावंत, चेतन दळवी, विकी सावंत, भाग्यदीप सावंत, स्वप्निल जाधव आदीनी या श्रमदानात सहभाग घेतला.

Related Stories

शेतकऱयांना तातडीने कर्ज, खत पुरवठा करा

NIKHIL_N

`”एका लग्नाची पुढची गोष्ट” कोकण दौऱयावर

Ganeshprasad Gogate

एसटी कामगार, इंटक पदाधिकारी कामगार सेनेत

NIKHIL_N

आज साडेसात हजार नागरिकांचे लसीकरण

NIKHIL_N

मुख्यमंत्र्यांच्या कोयना प्रकल्प दौऱयावर डॉ.नातूंची टीका

Patil_p

जिह्यात चाचण्यांसह पुन्हा रुग्णसंख्येत घट

Patil_p
error: Content is protected !!