तरुण भारत

कायद्याच्या चाकोरीतून बैलगाडी शर्यतीबाबत मार्ग काढू – जयंत पाटील

प्रतिनिधी / इस्लामपूर

बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसवून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी मंत्रालयात जमलेल्या शेतकरी बांधवांना दिले.

या बैठकीस गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्या सह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडी स्पर्धा पूर्ववत सुरु राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी घेतल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येईल.गरज भासल्यास नवीन कायदा करण्यात येईल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, शेतकरी आणि बैलगाडी मालक आणि विविध संघटनांची शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरु करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी राज्यातून आलेल्या बैलगाडी मालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व सूचना मांडल्या. उपस्थित आमदारांनी बैलगाडी शर्यतीविषयी मनोगत मांडले.

Advertisements

Related Stories

क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वार ठार: मिरज एमआयडीसीतील घटना

Sumit Tambekar

नोकरीसाठी गंडा घालणारी टोळी जेरबंद

Patil_p

नगरसेवक अपात्रता मंगळवारी सुनावणी

Abhijeet Shinde

फलटण प्रांताधिकाऱयांना वाळूमाफियाकडून धक्काबुक्की

Patil_p

सांगली : सामाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमुळे शासनाला हातभार : पालकमंत्री

Abhijeet Shinde

जिल्हा हादरला : एकाच दिवसात ५८ नवे रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!