तरुण भारत

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी:

गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र, ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत, त्‍यांनी जिल्‍हयात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा. परंतु, 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्‍याने त्‍यांच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली..


शासनाच्‍या https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्‍थळावरुन दोन मात्रा पूर्ण झालेल्‍या नागरिकांनी प्राप्त होणारा Universal Pass उपलब्ध करुन घ्‍यावा. जेणेकरुन प्रवासादरम्‍यान तपासणीकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होईल.
गणेशोत्सव 2021 साठी महाराष्‍ट्र शासन, गृह विभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरएलपी 0621/प्र.क्र. 144/विशा 1 ब दिनांक 29 जून 2021 अन्‍वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव 2021 चा सण साजरा करण्‍यात यावा असेही यात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

घर कोसळून एक ठार : तीन जखमी

Patil_p

22 दिवसांत तब्बल दहा रुपयांनी पेट्रोल महागले

NIKHIL_N

नव्या अग्निशमन बंबाने लावली राजकीय आग!

Patil_p

रत्नागिरी : अणदेरी येथील एकाचा नदीत पडून मृत्यू

Abhijeet Shinde

जिह्यात पुन्हा पावसाचा तडाखा

Patil_p

‘गोष्ट एका कावळय़ाची’ला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!