तरुण भारत

‘रावणलीला’मधून प्रतीक गांधीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

स्कॅम 1992 च्या माध्यमातून ठरला लोकप्रिय

सोनी लिव्हची वेबसीरिज ‘स्कॅम 1992-द हर्षद मेहता स्टोरी’मुळे लोकप्रिय झालेला प्रतीक गांधी आता स्वतःच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. प्रतीक यापूर्वीही गुजराती तसेच हिंदी चित्रपटांमधून झळकला आहे. पण नायक म्हणून रावणलीला हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे.  याचमुळे या चित्रपटाला त्याचा पदार्पणातील चित्रपट म्हटले जात आहे.

Advertisements

रावणलीला चित्रपटाचा फर्स्ट लुक मंगळवारी सादर करण्यात आला आहे. पोस्टरवरर प्रतीक अभिनेत्री ऐंद्रिता रेसोबत बासुरीवादनाच्या मुद्रेत दिसून येतो. पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्येही प्रतीकला रावणाच्या गेटअपमध्येही दाखविण्यात आले आहे.

पोस्टरवर ‘ राम में क्यो तूने रावण को देखा’ असे नमूद आहे. चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांचे आहे. हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याचे समजते. प्रतीक याचबरोबर अतिथी भूतो भव आणि डेढ बीघा जमीन या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Related Stories

अभिनेता आशुतोष गोखले जपतोय सामाजिक बांधिलकी

Patil_p

जान्हवी कपूरची सुट्टी वाळवंटात

Patil_p

काम्या पंजाबी का भडकली

Patil_p

अभिनेत्री एवलिन शर्माला कन्यारत्न

Patil_p

गोष्ट एका पैठणीचीसाठी सायली रमली डबिंगमध्ये

Patil_p

ऑडिशन्समध्ये अजून होते रिजेक्ट

Patil_p
error: Content is protected !!