तरुण भारत

रत्नागिरीतील घडामोडींचे सिंधुदुर्गात पडसाद

मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यावर शिवसेना, तर राणेंवरील कारवाईच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

Advertisements

मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह विधान व त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया सिंधुदुर्ग जिल्हय़ातही पडसाद उमटले. राणेंविरोधात शिवसैनिकांनी, तर शिवसेना, सरकारविरोधात राणे समर्थकांनी जोरदार निदर्शने केली.

सिंधुदुर्गात शिवसेना प्रचंड आक्रमक झाली. जिल्हाभरात शिवसैनिकांनी रस्त्यावर येऊन राणेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्या अटकेची मागणी केली. काही ठिकाणी राणेंच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचेही दहन करण्याचा प्रयत्न झाला. कुडाळला राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर येत शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणे हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते असून त्यांच्यावर कितीही गुन्हे दाखल केले, तरी त्याला सडेतोड उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रा रोखायचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा राणे समर्थकांनी दिला.

जिल्हाभरात शिवसेनेकडून निदर्शने

कणकवलीत शिवसैनिकांनी नरडवे नाका येथे नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत शिवसैनिकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेतला. त्यामुळे पोलीस व शिवसैनिकांमध्ये बाचाबाची व झटापट झाली. या कृतीमुळे कणकवलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वेंगुर्ल्यात शिवसेनेकडून नारायण राणेंच्या वक्तव्याच्या निषेर्धात शहरात फेरी काढून राणेंविरोधात जोरदार घोषणा करण्यात आली. नारायण राणे यांची सावंतवाडीतील जनआशीर्वाद यात्रा रद्द करण्यात यावी अन्यथा ही यात्रा शिवसैनिक हाणून पाडतील, असा इशारा सावंतवाडीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदनाद्वारे दिला. कुडाळ येथे शिवसेनेच्यावतीने राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राणे यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱया राणे यांना दोडामार्गात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला. तेथील गांधी चौकात धुरी तसेच अन्य शिवसैनिकांनी राणेंविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अन्यथ रस्त्यावर उतरू, असा इशारा वैभववाडीत शिवसेनेकडून देण्यात आला. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करण्याच्या हेतूने राणे हे सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने करीत आहेत. त्यामुळे राणेंविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा व भारतीय दंड विधानांतर्गत गुन्हे दाखल करावेत. अन्यथा जिल्हय़ात शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मालवणला शिवसेनेकडून देण्यात आला.

 भाजपकडूनही राज्य सरकारविरोधात निदर्शने

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हय़ात भाजपकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सावंतवाडीत भाजपकडून राज्य सरकारविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. ‘नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत सावंतवाडी येथील मुख्य रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारने सूडबुद्धीने अटक केली आहे. जोपर्यंत राणे यांच्यावरील कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरेंविरोधात बेताल वक्तव्ये करणाऱया राणेंना दोडामार्गमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुखांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला प्रत्युत्तर sदेताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व त्यांच्या शिवसैनिकांनी नारायण राणे यांना दोडामार्गात पाय ठेवू देणार नाही, अशा फुकट वल्गना करू नये. उलट त्यांचेच पाय शिल्लक राहतील की नाही ते पाहावे, असा प्रतिवार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. तर कुडाळला शिवसेनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नारायण राणे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राणेंवर झालेल्या अटक कारवाईच्या निषेधार्थ कणकवलीत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. तर आचरा मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून रस्ता रोखण्याचा प्रयत्न झाला.

Related Stories

कोविड सेंटरमधील कचरा नगरपंचायतीच्या वाहनाने उचलला

Patil_p

लॉकडाऊनमध्येही ‘कोरे’ मार्गावर काम सुरू

NIKHIL_N

45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी आज कोविशिल्डचा दुसरा डोस

Patil_p

आरोग्य, पोलीस, सफाई कामगारांचा युटय़ुब गौरव

Patil_p

सावंतवाडी पालिकेच्या ताफ्यात हायड्रॉलिक शिडी

NIKHIL_N

जिह्यात सलग दुसऱया दिवशी 23 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!