तरुण भारत

2022 च्या विधानसभेत निवडणूक गोव्यात परत भाजपचे सरकार : आमदार दयानंद सोपटे

प्रतिनिधी /पेडणे

येणाऱया 2022 च्या   विधानसभेत निवडणूक गोव्यात परत भाजपचे सरकार येणार असून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना परत मुख्यमंत्री म्हणून  खुर्चीवर बसवण्यासाठी मांदे  मतदार संघातून आपण त्यांना पहिला आमदार म्हणून  सहकार्य करणार असून येणाऱया विधानसभेनंतेर माझा डा?.प्रमोद सावंत यांना  पूर्ण पाठिंबा असेल आणि तेच गोवा राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री म्हणून आरूढ होणार असल्याचे  उद्गार मांदे  मतदार संघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी चोपडे येथे केले.

Advertisements

  मुख्यमंत्री मंगळवारी मांदे मतदार संघाच्या  दौऱयावर आले असता सर्वप्रथम  मुख्यमंत्री डा?क्टर प्रमोद सावंत यांच्या  हस्ते  सायकल ट्रकच्या चोपडे ज?क्शन ते खिंड मोरची यांचे  उद्घाटन प्रसंगी केले .

  यावेळी त्यावेळी गोळय़ा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच मोठय़ा संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. सोपटे पुढे   म्हणाले की एवढय़ा मोठय़ा संख्येने आज इथं भाजपाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या दौऱयाच्या वेळी उपस्थित राहिले आहे. त्यांचे आपण सर्वांचे स्वागत करतो तसे त्यांना धन्यवाद देतो. आज सात ठिकाणी विविध कामांचा शुभारंभ होणार असून काही केलेले काम पूर्ण झालेले आहे त्या अनुषंगाने आज मांदे मतदार संघाचा चौफेर विकास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि येणाऱया विधानसभेत परत एकदा डॉक्टर प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री होणार असून आपण त्यांना सहकार्य करणार असल्याचे यावेळी आमदार दयानंद सोपटे म्हणाले.

मांदे मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गीः डा?.प्रमोद सावंत

 यावेळी बोलताना  राज्याचे मुख्यमंत्री डा?क्टर प्रमोद सावंत म्हणाले की आज मांदे मतदारसंघात विविध विकास  कामाचा शुभारंभ होणार आहे. आज  आयोजित केलेल्या   दौऱयात  मोठय़ा संख्येने येथे भाजपचे कार्यकर्ते  तसेच विविध पदाधिकारी उपस्थित आहेत. आजची उपस्थित  आपण  पाहून  भारावून गेलो असून दयानंद सोपटे यांनी विकास कामाचा धडाका लावलेला आहे.  येणाऱया काळात राहिलेली आहेत कामे ती ते पूर्ण करणार असल्याचे यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले.

चोपडे येथे मांदे मतदारसंघात डा?क्टर प्रमोद सावंत यांनी    प्रवेश केला त्यावेळी त्यांचे  भव्य स्वागत  भाजप महिला कार्यकर्त्यांनी ओवाळून केले.

यावेळी आमदार दयानंद  सोपटे , भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब, सरचिटणीस सुदेश सावंत, महिला मोर्चा उपाध्यक्ष नयनी शेटगावकर, उत्तर गोवा उपाध्यक्ष एकता चोडणकर, आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर,पार्से सरपंच प्रगती सोपटे , मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर  तुये सरपंच सुहास मळीक ,  युवा मोर्चा अध्यक्ष रामा नाईक आणि मोठय़ा प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यांनी चोपडे ज?क्शन ते खिंड मोरची पर्यंत सायकल ट्रकचा तसेच वीज दिव्याचा पेटवून शुभारंभ केला.

Related Stories

मडगाव नगरपालिकेत लोकांची गर्दी

Omkar B

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा 82 वा वाढदिवस हजारो चाहत्यांच्या साक्षीने साजरा

Patil_p

चीनमध्ये होणाऱया ऑलिंपिकवर बहिष्कार घाला

Amit Kulkarni

फोंडा पोलीस उपनिरीक्षकाने ज्येष्ठ नागरिकाला मारली थप्पड

Omkar B

मनपाच्या 75 स्वीपर्सना कायमस्वरुपी सेवेत रुजू करून घेणार

Amit Kulkarni

पाच पालिकांचे भवितव्य लटकतेच

Amit Kulkarni
error: Content is protected !!