तरुण भारत

माजी मंत्र्यावर आली पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ

ऑनलाईन टीम / काबुल :

तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. भीतीपोटी अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानचे माजी संचार मंत्री सय्यद अहमद शाह सादत यांनीही देश सोडून जर्मनीत आश्रय घेतला आहे. जर्मनीत सय्यद यांच्यावर पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ आली आहे. जर्मनीतील इएचए न्यूजने यासंदर्भात फोटोही शेअर केले आहेत.

Advertisements

सय्यद शाह यांनी वर्षभरापूर्वीच अफगाणिस्तानात संचार मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर भीतीपोटी त्यांनी जर्मनीत आश्रय घेतला. जर्मनीत उदरनिर्वाह करण्यासाठी ते आता पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करत आहेत. जर्मनीतील लीपजिगमध्ये सायकलवरून पिझ्झा डिलिव्हरी करताना त्यांचे फोटो व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, याबाबत माजी मंत्र्यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही.

Related Stories

इस्लामाबादमध्ये मुखपट्टा अनिवार्य

Patil_p

अर्जेंटिनात कोरोनाबाधितांनी गाठला 10 लाखांचा टप्पा

datta jadhav

रशिया, ब्राझीलमधील संकट कायम

Patil_p

कोरोनापेक्षा अधिक घातक असणार भविष्यातील महामारी

Patil_p

टिकटॉक, वी-चॅटवर बंदी घालण्याऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

datta jadhav

बांगलादेशच्या मदतीसाठी सरसावला भारत

Patil_p
error: Content is protected !!