तरुण भारत

“घरात घुसून राणेंचा कोथळा बाहेर काढू”; शिवसेना आमदाराचं प्रक्षोभक विधान

मुंबई/प्रतिनिधी

सोमवारी रायगडमधील महाड येथे वपोरजमपबो जन आशीर्वाद यात्रेनंतर नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री नारायण राणे ?(union minister narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. राणे यांनी केलेल्या खळबळजनक विधानवरून अगोदरच महाराष्ट्रातील राजकारणत तापलेलं असताना व भाजपा आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरु असल्याचे चित्र असताना, आता यामध्ये आणखी एका नवीन प्रकरणाची भर पडली आहे. नारायण राणेंवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली आहे.

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेनेचे हिंगोलीमधील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Shiv Sena MLA Santosh Bangar) यांनी आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. माध्यमांशी बोलताना नारायण राणेंवर टीका करताना शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणाले की, ”अरे तू काय सांगतो कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलीस संरक्षण थोडसं बाजूला कर, हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केलं, तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको.”

दरम्यान भाजपाने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात ठरवलं असून, तक्रार देखील दाखल केली जाणार आहे. त्यामुळे राजकारणातील खळबळजनक वक्तव्यांची मालिका ही थांबलेली नसल्याचं दिसून येत आहे.

Advertisements

Related Stories

जिल्ह्यातील प्रभारी मंत्री बदलणार

Abhijeet Shinde

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Abhijeet Shinde

चीनकडून सायबर हल्ल्याची शक्यता, 20 लाख भारतीयांचे इमेल्स निशाण्यावर

datta jadhav

लष्करप्रमुख नरवणेंचा पाकिस्तानवर हल्लाबोल

Patil_p

राहुल गांधींसोबतच्या ‘त्या’ फोटोवर संजय राऊत म्हणाले…

Abhijeet Shinde

कर्नाटक: जेडीएसचा गोहत्या बंदी विधेयकास पूर्ण विरोध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!