तरुण भारत

कोल्हापूर : मुलीसह आईची वारणा नदीत उडी मारुन आत्महत्या

प्रतिनिधी / वारणानगर

येथील वारणा नदीवरील कोडोली – चिकुर्डे (ता. पन्हाळा) या धरण पुलावरून मंगळवार दि.२४ रोजी रात्री उशीरा आईने व दत्तक घेतलेल्या मतिमंद मुलीसह उडी घेवून आत्महत्या केली या दोघींचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडला आहे. रेश्मा अमोल पारगावकर (वय ३६) मुलगी रुद्रा (वय ७) रा पांडुरंग तात्या कॉलनी कोडोली ता.पन्हाळा असे त्यांची नाव आहे. या घटनेची नोंद कुरळप (ता. वाळवा) पोलीस ठाण्यात झाली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी पतीचे अपघाती निधन व दत्तक मुलगी मतिमंद असल्याने आलेल्या नैराशेतून आत्महत्या केल्याचे पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीमधूम समजते. कोडोली येथील रेश्मा व तिच्या पतीने चार महिन्याची रुद्रा ही मुलगी दत्तक घेतली होती. परंतु दहा महिन्यानंतर ती मतिमंद असल्याचे त्यांना समजले होते. तरीही त्यांनी तिचा लळा लागल्याने तिचा चांगला सांभाळ करत होते. रेश्मा ही कोडोली येथील खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. रेश्मा हीच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. दत्तक घेतलेली मुलगी रुद्रा ही मातीमंद व पतीचे निधन त्यामुळे ती अस्वस्थ होती.

Advertisements

या रुद्रा मुलीसह मंगळवार दि.२४ रोजी रात्री उशीरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. तिथे असणाऱ्या मच्छीमार व अन्य एका तरुणाने सुमारे दोन तास त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परत पाठवल्याचे समजते. तदनतंर रात्री उशिरा तिने मुलीसह नदी पत्रात उडी घेतल्याचे काही नागरिकांनी बघितले. त्यांनी ही बाब कोडोली पोलिसांना कळवली होती. तथापी रात्री अंधार असल्याने त्यांना शोधता आले नाही. आज सकाळी आई रेश्मा हिचा ऐतवडे खुर्व येथे मिळून आला तथापी रुद्राचा मृतदेह मिळाला नाही. घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव व कर्मचारी,कोडोली ग्रामपंचायत, तलाठी अनिल पोवार,जीवन ज्योत आपत्कलीन सेवा संस्थेचेसंस्थापक अध्यक्ष सुनील जाधव,अमर माडिमगिरीहनुमंत कुलकर्णी,ओंकार लोहार,दयानंद धबधबे, त्तात्रेय कांडेकर,आलका हिरवे,ज्योत्सना हिरवे,स्वाती भोसले,हेमंत कड्यापगोळ पक आवळे मनसेचे पन्हाळळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड कार्यकर्ते यांच्या सयुक्तपणे कोडोली ग्रामपंचायतीच्या आपत्कालीन बोटीने शोध घेण्याचे काम सुरू केले असता दुपारी चारच्या सुमारास मुलगी रुद्रा हीचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडल्यावर पुढील सोपस्कार पार पडले अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम परिसरात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

triratna

गोकुळची झेप आंतराष्ट्रीय पातळीवर

triratna

जाता जाता ताईने तिघांना दिले जीवदान

triratna

सभासदांना लाभांश, ठेव वाटप करण्यास परवानगी द्या

triratna

कोल्हापूर : जिल्हय़ात बळींची संख्या शंभरावर, एका दिवसात १२ बळी

triratna

वाकरे गाव तलावाच्या उत्खननात अनेक ऐतिहासिक बाबींचा उलगडा

triratna
error: Content is protected !!