तरुण भारत

सचिन वाझेंची विशेष एनआयए कोर्टात धाव ; केल्या ‘या’ तीन मागण्या


मुंबई \ ऑनलाईन टीम

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात अटक असलेला आरोपी आणि निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली आहे. कुटुंबीयांना भेटण्याच्या परवानगीसह काही मागण्यांसाठी वाझे यांनी अर्ज केला आहे.

सचिन वाझे यांनी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्याचबरोबर घरच्या सदस्यांना भेटण्याची आणि घरचे जेवण मिळण्याबाबतही परवानगी मागितली. सचिन वाझेंच्या वकिलांनी एनआयए कोर्टात यासंबंधी अर्ज केला आहे.

दरम्यान, एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे यांनी वाझेची कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र इतर दोन अर्ज म्हणजेच खाजगी रुग्णालयात उपचार आणि घरच्या जेवणासंदर्भात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सचिन वाझे यांना तीन हार्ट ब्लॉकेजेस असून बायपास करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Related Stories

कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊन; पहा ही दृश्ये

Abhijeet Shinde

शंभर वर्षातील गडद संकट

Patil_p

देशात मागील 24 तासात कोरोनाचे 37,593 नवे रूग्ण, 648 मृत्यू

Rohan_P

मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना रनौत उमेदवार?

Patil_p

लॉक डाउनमुळे कर्नाटकातील परराज्यात अडकलेले यात्रेकरु सुरक्षित

Abhijeet Shinde

भारत-चीन सीमावादावर आज तोडगा निघण्याची शक्यता

datta jadhav
error: Content is protected !!