तरुण भारत

सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू: आशिष शेलार

मुंबई/प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेलेल्या खळबळजनक विधानानंतर त्यांच्याविरोधात नाशिकमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. यांनतर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचे आदेश दिले. नाशिक पोलीस पोहोचण्याआधी रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. रात्री वेळाने राणे यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान राणेंच्या अटकेवर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब, पोलिस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह आयपीएस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. तसेच त्यांनी ठकरे सरकारवर टीका करताना त्यांनी ‘सुरुवात तुम्ही केलं आहे शेवट आम्ही करणार’ अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.

Advertisements

Related Stories

मलकापूर शहराचे पाच झोनमध्ये विभाजन, प्रभाग पूर्णत: सील

Abhijeet Shinde

”महाराष्ट्राचे वाटोळे झाल्यानंतर पवारसाहेबांची नाराजी”

Abhijeet Shinde

एमटीडीसी निवासात लग्न, वाढदिवस साजरे होणार!

Patil_p

कोल्हापुरातील पूरस्थिती Live Update फक्त एका क्लिकवर : काळम्मावाडीतून १००० क्युसेक विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

चितारआळी आजपासून पूर्ववत

NIKHIL_N

अखेर कोल्हापुरातून टेकऑफ…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!