तरुण भारत

नोकरदार महिलांना तालिबानने सांगितलं, घरीच थांबा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

अफगाणिस्थानवर कब्जा केलेले तालिबानी आरंभीच्या टप्प्यात आपण सर्वांसाठी न्यायपूर्ण नियमावली ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विषेशत: महिलांसाठी दिवसेंदिवस कोणत्या ही जाचक अटी नसतील असे त्यांनी सांगितले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महिलांसाठी कायदे व नियमावली अधिक अधिक कठीण बनत आहे. याच पार्श्वभूमीवर नोकरी करणाऱ्या महिलांना घरीच थांबा असे तालिबानने सांगितलं आहे.

तालिबानी दिवसेंदिवस वेगवेगळे आदेश, फतवे काढत असून त्या द्वारे स्त्रियांवर पून्हा अंकूश ठेवला जात आहे. यावर तालिबान प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सुरक्षेच्या कारणास्तव महिलांनी घरीच राहावे असे स्पष्टीकरण दिले आहे.

नव्या शासनव्यवस्थेकडून वारंवार महिलांना शरियत कायद्याच्या अंतर्गत काम करण्यापासून रोखले जाणार नाही किंवा मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखले जाणार नाही. तरी ही महिलांनमध्ये याबद्दल घबराट आहे. यावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख मिशेल बॅचेलेट म्हणाल्या की, तालिबान्यांनी महिला आणि मुलींशी केलेली वागणूक ही धोक्याची घंटा असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

Advertisements

तालिबान विषयी महिलांमध्ये इतकी का दहशत

वीस वर्षांपूर्वी अफगाण भूमीवर तालिबान सत्तेत असताना महिलांना प्रचंढ विषमतेची वागणूक मिळाल्याने हीत दहशत अफगाण महिलांना सतावत आहे. कारण पून्हा जुलमी शरियत कायदे लागू झाल्यास महिलांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळणार असून, यात स्त्रिया दुरचित्रवाणी पहता न येणे, पेहराव काय असावा, शिक्षणाच्या जाचक अटी, महिलांवर लादल्या जाऊ शकतात.त्यामूळे तालिबानची नेमकी भूमिका काय असणार यावर तालिबानी महिलांचे भविष्य असणार आहे.

Related Stories

…तर ‘एच 1-बी’ व्हिसावरील स्थगिती उठवेन : बिडेन

datta jadhav

उमर खालिद विरोधात अभियोग चालविण्यास अनुमती

Patil_p

ट्रम्प यांना धक्का; मिशिगन, जॉर्जियामधील दावे न्यायालयाने फेटाळले

datta jadhav

आयएएस अधिकारी विजयशंकर यांची आत्महत्या

Patil_p

देशात संसर्गवाढ धोकादायक पातळीवर

Patil_p

ब्रिटनच्या ब्रिस्टॉल शहरात झाला महात्मा गांधींच्या चष्म्याचा लिलाव

datta jadhav
error: Content is protected !!