तरुण भारत

कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

सातारा एमआयडीसीतील घटना

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा एमआयडीसी परिसरात कारंडवाडी (ता. सातारा) गावाच्या अलिकडे भोर फाटय़ावर असलेल्या चौकात एका कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने बुधवारी या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे मोठय़ा प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती. ती हटवून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. कारमध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्याचे नाव रविंद्र यशवंत शेलार (वय 40, रा. कारंडवाडी, ता. सातारा) असे समोर आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास सातारा ते कारंडवाडी रस्त्यावर एमआयडीसीतील चौकात एक कार रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, ही घटना सातारा शहर पोलीस ठाण्याला कळवण्यात आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, डीबीचे कर्मचारी घटनास्थळी गेले.

यावेळी तिथे असलेल्या कार (क्रमांक एम. एच. 12, एफ. ए. 4840) मधील मागील सीटवर एकाजण मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या नाकातून थोडं रक्त वाहिलेले होते. बाकी त्याच्या अंगावर मारहाण, झटापटीच्या काही खुणा नव्हत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला. त्याच्या खिशातील कागदपत्रांवर त्या व्यक्तीचे नाव रविंद्र यशवंत शेलार असल्याचे समोर आले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही भेट देवून पाहणी केली.

शेलार यांचा मृतदेह गाडीतील मागच्या सीटवर होता. त्यांनी मद्यप्राशन केले होते. गाडीच्या काचाही बंद होत्या. त्यांच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी हा घातपाताचा प्रकार वाटत नसला तरी पोलिसांनी कारंडवाडीतील काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. रविंद्र शेलार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.  

रविंद्र शेलार होते रिक्षाचालक

मृत रविंद्र शेलार यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कारंडवाडीत खळबळ उडाली. त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या त्यांच्याच मालकीच्या कारमध्ये आढळून आल्याचे कळताच शेलार यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. शेलार यांना दोन लहान मुले असून या घटनेमुळे शेलार कुटुंबियांचा आधार हरवला आहे. या घटनेमुळे शेलार कुटुंबावर आकाश कोसळले आहे. या घटनेची कारंडवाडीसह एमआयडीसीत चर्चा सुरु होती.  

काहीजणांची पोलिसांकडून चौकशी

दरम्यान, या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा हलवली. मोबाईलच्या तपासणीनंतर कारंडवाडी परिसरातील काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतर सोडून देण्यात आले. प्रथमदर्शनी ही घटना घातपाताची वाटत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असले तरी शवविच्छेदन अहवाल व व्हिसेरा अहवाल आल्यानंतर शेलार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बंधे यांनी सांगितले.

Related Stories

कास पुष्प पठारचा हंगाम समाप्तीकडे…

datta jadhav

सातारा : गोडोलीत तरसाचे दर्शन

datta jadhav

दोन मुलांचा खून करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

सातारा : वीज बिल माफ होणार ! ‘ही अफवाच’

Abhijeet Shinde

खा. उदयनराजेंनी ओपन गाडीतून मारली रपेट

datta jadhav

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा अत्याधुनिक वॉर्ड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!