तरुण भारत

वास्कोतील कदंब स्थानकाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा व निदर्शने

प्रतिनिधी /वास्को

वास्कोतील कदंब स्थानक प्रकल्पाच्या गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वास्कोतील काही नागरिकांनी या स्थानकापर्यंत मोर्चा आणून निदर्शने केली. गेली पाच वर्षे हा प्रकल्प रखडत ठेवल्या प्रकरणी सरकारचा व स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांचा कदंब स्थानकावर जमलेल्या लोकांनी जोरदार निषेध केला. जमलेल्या लोकांमध्ये युवा वर्गाचा मोठा भरणा होता.

Advertisements

   वास्कोतील कदंब स्थानक प्रकल्पाकडे सरकारने दुर्लक्ष केलेले असून रखडलेल्या कामामुळे कदंब स्थानकाची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे वास्कोतील लोकांना गेली अनेक वर्षे कष्ट सोसावे लागत आहेत. स्थानिक आमदारांकडून या प्रश्नावर वेगवेगळे खुलासे करण्यात येत असतात. परंतु ही सर्व वास्कोवासियांची फसवणुक चालवण्यात आलेली असून गेल्या पाच वर्षांत बस स्थानकाचे कसलेच काम पुढे गेलेले नाही. शिवाय वास्कोत गेल्या दहा वर्षांत कसलेच विकास काम झालेले नाही. बस स्थानकाच्या सद्याच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठीच हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला असून सरकारने जनतेच्या समस्येची त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जमलेल्या लोकांनी सरकार व आमदारांच्या बेपवाईच्या निषेधार्थ हातात फलकही घेतले होते.

Related Stories

उपचारांअभावी मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता

Amit Kulkarni

पणजी मार्केटमधील बारमालक कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

म्हादई अभयारण्याच्या देरोडे येथील टेहळणी केंद्राला स्थानिकांचा कडक विरोध

Patil_p

कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 96.52 टक्के

Amit Kulkarni

पिस्तुलातून चुकून सुटलेल्या गोळीने बालक गतप्राण

Amit Kulkarni

वानप्रस्थाश्रमाला आधुनिक आयाम देणाऱया शर्मिलाताई

Amit Kulkarni
error: Content is protected !!