तरुण भारत

झिकाचा धोका

 • उपचाराची पद्धतः झिका व्हायरसवर कोणतेही निश्चित औषध किंवा लस नाही. त्यावरील उपचार सिप्टोंमेटिक असते. म्हणजेच रुग्णांच्या स्थितीनुसार मेडिसिन देण्यात येते. सीडीसीनुसार झिका बाधित लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करणे, लिक्विड डायटचे सेवन करणे, अंगीदुखी आणि तापेसाठी पॅरासिटॉमल औषध देणे गरजेचे आहे
 • जागतिक आरोग्य संघटनेने झिका व्हायरसला ‘ग्लोबल हेल्थ इमरजन्सी’ म्हणून घोषित केले आहे.  अलिकडच्या महिन्यात देशात झिका संसर्गाचे रूग्ण पाहवयास मिळत आहे.
 • मे महिन्यात केरळमध्ये चोवीस वर्षाच्या एका गर्भवतीस झिका संसर्गाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नॅशनल इंन्स्टिटय़ूट ऑफ व्हेरॉलॉजीने देखील आणखी काही व्यक्तींना झिकाची बाधा झाल्याचे स्पष्ट केले. काही काळानंतर महाराष्ट्रात देखील झिकाचा रूग्ण आढळून आला.
 • झिका व्हायरसचा प्रसार हा एडिज इजिप्टी नावाचा डास चावल्याने  होतो. पाण्यात वाढणारा डास हा सकाळच्या वेळी चावतो. हा डास फ्लेव्हिविरिडी फॅमिलीच्या संसर्गातून पसरतो. याशिवाय डेंग्यू, चिकनगुणियासारख्या आजारास देखील हा डास कारणीभूत ठरतो.
 • अमेरिकेच्या सीडीसी संस्थेच्या मते, झिका व्हायरस हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. याशिवाय सेक्सुअल ट्रान्समिशन, ब्लड ट्रांन्सफ्यूजन आणि स्तनदा मातेकडून बाळाला झिका संसर्ग होण्याचा धोका राहतो.
 • या आजाराचा सर्वाधिक धोका गर्भवतींना आहे. कारण त्याच्या संसर्गातून महिलांच्या गर्भात वाढणार्या बाळाला मायक्रोसिफेली रोग होण्याचा धोका असतो. हा एक जन्मजात दोष आहे.
 • यात नवजात शिशूच्या मेंदूचा पूर्णपणे विकास होत नाही. परिणामी त्याचे डोके सामान्यापेक्षा लहान राहते. मुलांत शारिरीक आणि मानसिक विकार होण्याची शक्यता राहते. अशावेळी मुलाची बौद्धिक क्षमता किंवा मानसिक स्तराची पातळी खूपच कमी राहते.
 • झिका संसर्ग झाल्यास व्यक्ती 3 ते 14 दिवसांपर्यंत बाधित राहतो. त्याची लक्षणे सर्वसाधारणपणे 2 ते 7 दिवसांत दिसतात. झिकाने बाधा झाल्यानंतर रुग्णात डेंग्यूसारखी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे किरकोळ असतात.
 • यात ताप येणे, शरीरावर रॅशेस येणे, सांधेदुखी, अंगदुखी, कंजेक्टिवायटिस किंवा डोळ्यात सूज, लाल होणे, जळजळ होणे, अस्वस्थता यासारख्या गोष्टी दिसू लागतात. परंतु काही लोकांत झिका संसर्गाचे कोणतेच लक्षणे दिसत नाहीत. म्हणजेच ते असिंप्टोमॅटिक असतात.
 • झिका संसर्गाच्या तावडीत सापडणार्या ज्येष्ठ नागरिकांना तात्पुरता अर्धांगवायू होण्याची भीती असते.
 • सीडीसीच्या मते, रुग्णाला दवाखान्यात दाखल होण्याची वेळ येत नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी राहते. ङउपचार ः रुग्णांत झिका संसर्गाचे कोणतेही लक्षण दिसल्यास अनेक प्रकारच्या चाचण्या करता येतात. अल्ट्रासाउंडमध्ये गर्भात वाढणार्या बाळांत झिका संसर्गामुळे काही उणिवा दिसत असतील तर या महिलांची झिका चाचणी करणे आवश्यक आहे. ही तपासणी रक्त, युरिन किंवा सीमेनच्या माध्यमातून करता येते. याशिवाय मॉलिक्यूलर टेस्टिंगच्या माध्यमातूनही संसर्गाचा शोध घेतला जातो. अँटीबॉडिजने देखील निदान करता येते. झिका व्हायरस संपूर्ण भागात पसरला असेल तर आणि त्याची लक्षक्षे दिसत असतील तर तातडीने चाचणी करा. 

Related Stories

पर्याय ओटसचा

tarunbharat

जपावे दंत आरोग्य

Omkar B

कॅव्हिडमुळे मेंदूवर परिणाम

Amit Kulkarni

प्रीमॅच्युअर बेबींमधील आजार

Omkar B

जपानी वॉटर थेरपी

tarunbharat

कोविड कवच पॉलिसी दहा जुलै पर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न

datta jadhav
error: Content is protected !!