तरुण भारत

बांदा – दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पुन्हा सुरु

प्रतिनिधी / बांदा:
बांदा – दोडामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत यांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ. निकिता सावंत व जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या मध्यस्थीने सदर कामाचा प्रारंभ करण्यात आला.


बांदा – दोडामार्ग राज्य मार्ग खड्डे पडल्याने पूर्णपणे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पंधरा दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी कार्यकारी अभियंता छाया नाईक यांनी पावसाळी डांबराने खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवसांनी सदर काम बंद करण्यात आले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक युवकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. गणेशचतुर्थी सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मुर्तीची वाहतूक करणेही जोखमीचे होते. त्यामुळे तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत यांनी खड्डे न बुजविल्यास प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. सभापती निकिता सावंत व माजी सभापती प्रमोद कामत यांच्या प्रयत्नातून सदर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाल्याची माहिती बाळू सावंत यांनी दिली.

Advertisements


यावेळी सभापती निकिता सावंत यांनी कामाची पाहणी केली. त्यांच्या समवेत माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापतीप्रमोद कामत, मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, माजी सरपंच मंदार कल्याणकर, शेर्ले सरपंच उदय धुरी, तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर, विकी केरकर, विनेश गवस, शाम सावंत, अक्षय परब, शुभम साळगावकर, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.

Related Stories

सर्व पालिकांच्या निर्णयांत एकवाक्यता हवी!

NIKHIL_N

इंदिरा आवाससह सर्वच घरांची कामे ‘लॉकडाऊन’

Patil_p

बांगड्याची मोठ्या प्रमाणात आवक, दर घसरल्यामुळे खवय्ये समाधानी

Abhijeet Shinde

गणेशोत्सवानानंतर जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन?

Patil_p

निजामुद्दीन कार्यक्रमात सिंधुदुर्गातील दोघे

NIKHIL_N

19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा ऋतिक सावंत कर्णधार

NIKHIL_N
error: Content is protected !!