तरुण भारत

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाराष्ट्र केसरी पैलवान अप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अनेक पैलवानांना आस्मान दाखवणारे आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते.

1992 साली आप्पालाल महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र 1991 साली न्युझिलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं. आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील 2002 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन महाराष्ट्र केसरी गदा आहेत. अशा या मल्लाच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Advertisements

Related Stories

पूरग्रस्त भागात वीज बिल वसुली स्थगित

Abhijeet Shinde

सातारा जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात 63 बाधित

Abhijeet Shinde

यू-19 वर्ल्ड कप : भारत-ऑस्ट्रेलिया आज उपांत्यपूर्व लढत

Patil_p

गोलंदाजांच्या हाराकिरीनंतर हार्दिक पंडय़ाची झुंज निष्फळ

Patil_p

वाढीव हद्दीला वाली कोण ?

Patil_p

पुण्यात सायबर चोरटय़ाचा व्यावसायिकाला 38 लाखांचा गंडा

Rohan_P
error: Content is protected !!