तरुण भारत

सापाचे सूप बेतले जीवावर

कापले होते सापाचे शिर : 20 मिनिटांनी सापाने घेतला शेफचा जीव

जिवंत साप अत्यंत धोकादायक असतो, पण दक्षिण चीनमधील एका घटनेने लोकांना धक्काच बसला आहे. येथील एक शेफ कोब्रा सापाद्वारे सूप तयार करत होता. यासाठी शेफने सापाचे तुकडे करून त्याचे शीर वेगळे करून ठेवले होते. सुमारे 20 मिनिटांनी शेफने कोब्राचे कापलेले शीर उचलताच त्याने चावा घेतला, यामुळे शेफचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

ग्वांगडोंग प्रांताच्या फोशान शहरातील शेफ पेंग फॅन हे इंडोचायनीज स्पिटिंग सापाच्या मांसाचा वापर करत सूप तयार करत होते. चीनमध्ये सापाद्वारे तयार झालेली डिश आणि सूप अत्यंत लोकप्रिय आहे, लोक हा प्रकार अत्यंत आवडीने खातात.

शेफने सूपची तयारी चालविली होती. सूपची तयारी करताना सुमारे 20 मिनिटांनी शेफने किचनची सफाई करताना सापाच कापलेले मुंडके कचरापेटीत टाकण्यासाठी उचलताच त्याला मोठा झटका बसला, कारण कापलेल्या मुंडक्यात अद्याप जीव शिल्लक होता, त्याने शेफला दंश केला होता.

44 वर्षीय लिन सन हे पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेथे त्यांना अचानक किचनमधून आरडाओरड ऐकू आली. तेथे गोंधळ उडाला होता. त्वरित एका डॉक्टरला बोलाविण्यात आले, पण तोपर्यंत शेफचा मृत्यू झाला होता असे लिन यांनी सांगितले आहे.

ही अत्यंत असाधारण घटना आहे. शेफला वाचविण्यासाठी काहीच करता येण्यासारखे नव्हते. साप आणि अन्य सरपटणारे प्राणी मारले गेल्यावरही एक तासापर्यंत हालचाल करू शकतात. कोब्राचे विष अत्यंत जहाल असते. यात न्यूरोटॉक्सिन असतात, जो 30 मिनिटांमध्ये जीव घेऊ शकतो असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

इराण विदेशमंत्र्यांचा लवकरच भारत दौरा

Patil_p

ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा लांबणीवर

Omkar B

न्यूयॉर्कमध्ये ‘रँकिंग’ प्रणालीने होणार महापौराची निवड

Amit Kulkarni

टायर्सच्या मोठय़ा साठय़ाला आग

Patil_p

चीनने सैनिकांना टोचली कोरोना प्रतिबंधक लस

datta jadhav

श्रीलंकेत जेलमध्ये दंगल; 8 कैद्यांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!