तरुण भारत

..अन् त्याने क्यूआर कोडचा टॅटूचं गोंदवला

कोरोना महामारीच्या काळात शॉपिंग मॉल, मूव्ही हॉल, किराणा दुकाने यासारखी अनेक सार्वजनिक ठिकाणे सुरक्षिततेसाठी व्यक्तींचे लसीकरण प्रमाणपत्र पाहिले जात आहे. सार्वजनिक परिवहन सेवेतून प्रवासासाठी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या कुठेही बाहेर जायचे म्हटल्यावर लसीकरण प्रमाणपत्र सोबत घेऊन जावे लागते.

एका व्यक्तीने प्रत्येकवेळी वैयक्तिकरित्या प्रमाणपत्र घेऊन जाण्याच्या अडचणींना तोंड देण्यासाठी त्याने हे एक मनोरंजक पाऊल उचलले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक व्यक्ती क्यूआर कोड टॅटू दाखवत असल्याचे दिसून येते. यामुळे स्कॅन केल्यावर लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त होते.

Advertisements

टॅटू आर्टिस्ट गॅब्रिएल पेलेरोनने शेअर केलेला व्हिडिओ, क्यूआर कोड टॅटू कसा काम करतो हे दर्शवितो. या व्हिडिओला 6,660 हून अधिक लाइक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही जणांना ही कल्पना आवडली. तर महामारी संपल्यावर टॅटू कशाप्रकारे अप्रासंगिक ठरेल हे सांगितले आहे.

टॅटूमधील क्यूआर कोड काम करतो की नाही हे पाहण्याचा प्रयोगही करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती मॅकडोनाल्ड्समध्ये जातो, बाहेरच तो टॅटू दाखवून कोड स्कॅन करतो आणि काही क्षणात त्याच लसीकरण प्रमाणपत्रही फोनवरून दिसून येते. तो पुढे मॅकडोनाल्ड्समध्ये ऑर्डर करून खातानाही दिसत आहे.

Related Stories

ब्रिटन जलवायू बदल मुद्यावर आर्थिक मदत देण्याचे संकेत

Patil_p

जॉर्ज फ्लॉयड हत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱयाला 22 वर्षांची शिक्षा

Amit Kulkarni

ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?

Sumit Tambekar

4,564 मुलांना बाधा

Patil_p

कोलंबियात आफ्रिकन, हैती स्थलांतरीतांची ठरतेय डोकेदुखी

Patil_p

स्वतःला दोषमुक्त करण्याच्या प्रयत्नात ट्रंप ?

Patil_p
error: Content is protected !!