तरुण भारत

दहा महिन्यांपासून सातारा तालुका हॉटस्पॉट

कोरोनाचे ग्रहण सुटेना,जिल्हय़ात 861 तर साताऱयात 186 बाधित : सातारा तालुक्याच्या संसर्ग वाढीचे कारण काय?

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

कोरोनाच्या दुसऱया लाटेत आकडय़ांचे चढउतार कायम आहेत. गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालात रूग्णांचा आकडा वाढून 861 इतका झाला आहे. यात सर्वाधिक 186 रूग्ण सातारा शहर व तालुक्यात वाढले असून गेल्या दहा महिन्यांपासून या तालुक्याचा संसर्ग कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे सातारा तालुक्यातील संसर्ग वाढीच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक बनले आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासात 9 बाधितांचा मृत्यू झाला असून 844 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

ऑक्टोबर 2020 पासून सातारा प्रथम क्रमांकावरच

कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रारंभापासून कराड तालुका हा हॉटस्पॉट होता. पहिल्या लाटेचा पीक येऊन गेल्यानंतर या तालुक्याची रूग्णसंख्या कमी झाली. मात्र सातारा तालुका प्रथम क्रमांकावर आला. तेव्हापासून सातारा तालुक्याची रोजची रूग्णसंख्या सर्वाधिक नोंद होत आहे. साताऱयात जम्बो कोविड सेंटर, जिल्हय़ातून उपचारासाठी येणारे रूग्ण असल्याने व जिल्हय़ात सर्वाधिक तपासण्या होत असल्याने येथे रूग्ण वाढणे स्वाभाविक आहे. मात्र सातारा पालिकेचा आरोग्य विभाग, सातारा पंचायत समितीचा आरोग्य विभाग यांनी शहर व तालुक्यातील नेमकी रूग्णसंख्या, त्याच्या वाढीचा वेग, संसर्ग वाढण्याची कारणे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

हॉटस्पॉटचा शिक्का कधी पुसला जाणार?

पहिल्या लाटेत सर्वाधिक रूग्ण असणारा कराड तालुका उतरणीच्या काळात सावरला. यात कराड शहर कोरोनामुक्तही झाले होते. दुसऱया लाटेत कराड तालुक्याची रूग्णसंख्या नियंत्रणात असताना अनलॉक आणि निवडणुकीमुळे पुन्हा तालुक्यात रूग्णवाढ झाली. ही रूग्णवाढही आता शंभराच्या खाली आली आहे. हे चित्र गेले 10 महिने सातारा शहर व तालुक्यात का दिसले नाही? रूग्ण का वाढत आहेत, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

साताऱयाच्या एकूण रूग्णसंख्येची 50 हजाराकडे वाटचाल

जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  861 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सर्वाधिक 186 रूग्ण साताऱयात नेंद झाले आहेत. या आकडय़ासह सातारा तालुक्याच्या एकूण रूग्णसंख्येची 50 हजाराकडे वाटचाल सुरू आहे.

फलटणला 181 रूग्ण

फलटण तालुक्यातही धक्कादायकरित्या रूग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. आजच्या अहवालात 181 रूग्णांची नोंद झाली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे-जावली 24 (9778),  कराड 90 (37564), खंडाळा 32 (13752), खटाव 108 (23910), कोरेगाव 94 (20750), माण 101 (16635), महाबळेश्वर  4 (4576), पाटण 5 (9893), फलटण 181 (34298), सातारा 186 (48764), वाई 33 (15266) व इतर 3 (1868) असे आज अखेर एकूण 237054 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

गेल्या चोवीस तासात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे- जावली 0 (214), कराड 2 (1153), खंडाळा 1 (189), खटाव 0 (592), कोरेगाव  3 (452), माण 1 (375), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (362), फलटण 0 (666), सातारा 1 (1432), वाई 0 (356) व इतर 1 (78), असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 5957 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

844  जणांना डिस्चार्ज

जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 844 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

गुरुवारी 45,454 जणांचे लसीकरण

गत दोन दिवसांमध्ये लसीकरणाचा वेग थोडा मंदावला होता. मात्र, गुरुवारी जिल्हय़ातील 45 हजार 454 जणांना लस मिळाली आहे. यामुळे एकूण लस घेतल्यांची संख्या 17 लाख 15 हजर 335 एवढी दिलासादायक झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 12 लाख 3 हजार 731 एवढी असून दुसरा डोस घेणाऱयांची संख्या 5 लाख 11 हजार 604 एवढी झाली आहे.

गुरूवारी जिल्हय़ात

  • एकूण बाधित 861
  • एकूण मुक्त 844
  • एकूण बळी 09

गुरूवारपर्यंत जिल्हय़ात

  • एकूण नमूने 1730165
  • एकूण बाधित 237054
  • घरी सोडलेले 225010
  • मृत्यू -5957
  • उपचारार्थ रुग्ण- 9397

Related Stories

साताऱ्यात आता ‘अॅन्टीबॉडीज घोटाळा’

Abhijeet Shinde

सेंकड लीड फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल

Patil_p

गेल्या १४ दिवसांत मुक्तीचं प्रमाण दीडपट ; दिवसभरात १९ बाधित,१ बळी

Abhijeet Shinde

जिल्हा परिषदेच्या सभेची रंगीत तालमीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीवर खल

Amit Kulkarni

खूनप्रकरणी फलटणच्या एकास जन्मठेप

Patil_p

सातारा रायडर्स ग्रुपकडून थरारक उरमोडी धरण ते कास पठार राईड

Patil_p
error: Content is protected !!