तरुण भारत

शिवसेना सातारा उपशहरप्रमुखपदी अहिवळे

प्रतिनिधी /सातारा

कठ्ठर शिवसैनिक आणि सामाजिक कार्यात ठसा उमठविणारे गणेश अहिवळे यांची सातारा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. शनिवारी दि.21 रोजी सातारा येथे शिवसेना शहर कार्यलाय येथे शिवसेना नेते, सातारा-सांगली संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. भविष्यात सातारा नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूकीच्या दृष्टीकोनातून शिवसेना सातारा शहर संघटन बांधणी केली जात आहे. शहरातील अनेक कार्यकर्ते सध्या पक्षाच्या संपर्कात असून संघटनेत महत्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. सातारा नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून शहरात पक्ष सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश अहिवळे यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा शहरप्रमुख निलेश मोरे, माण, खटाव संपर्कप्रमुख शंकर वीरकर यांच्या सह शहरातील शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कोरोनामुळे औंध संगीत महोत्सवाचा सूर झाला बेसूर

Abhijeet Shinde

सलग 75 तास लसीकरण मोहिम सुरू

Patil_p

पुस्तके खरेदी करण्यासाठी साताकरांची तोबा गर्दी

Patil_p

प्रथमच ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत होणार ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा

Abhijeet Shinde

तब्बल दिड वर्षाने दुकाने 10 पर्यंत खुली

Patil_p

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!