तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच `स्पॉटेड डिअर’चे दर्शन

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात येणाऱ्या कॉरिडॉरमध्ये वाघाचे अस्तित्व आहे. या वाघासाठी महत्वाचे खाद्य असलेल्या हरिणांचे अस्तित्वही वन विभागाला मिळून आले आहे. घनदाट जंगलात असणाऱ्या स्पॉटेड डिअरचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने वाघासाठीच्या सर्वोत्तम पर्यावरण साखळीला बळकटी आली आहे. कोरोना काळ वन्यजीवांच्या वाढीसाठी अधिक पोषक ठरला आहे.

Advertisements

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे पर्यटकांची संख्या घटली, परिणामी जंगल पर्यटनातून वन्यजीवांना होणारा डिस्टर्बन्स कमी झाला. गेली पावणेदोन वर्षे ही स्थिती राहिल्याने विविध वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाली आहे. दाट जंगलात असणाऱया, पण दर्शन होणाऱया वन्यजीवांचे दर्शन सहजपणे होऊ लागल्याने वन्य जीवांची संख्या वाढल्याचे हे संकेत आहेत. जिल्हÎात सह्Îाद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत कॉरिडॉरचा समावेश आहे, अन् याला लागून असलेल्या भागात आता तृणहारी व मांसाहारी प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत 1166 चौरस किलोमीटर क्षेत्रात 8 पट्टेरी वाघांची नोंद आहे. नॅशनल टायगर कंझर्व्हेशन ऍथॉरिटीने 2014 मध्ये या क्षेत्रात 5 ते 7 पट्टेरी वाघ असल्याचे नमूद केले होते. पण अलीकडच्या काही वर्षांत वाघांसाठी पूरक असलेल्या तृणहारी प्राण्यांच्या संख्या या क्षेत्रात वाढली आहे. प्राणीगणना मोहिमेतही ती दिसून आली आहे. कमीतकमी मानवी हस्तक्षेप अन् जास्तीत जास्त वन्य प्राणी संरक्षण, संवर्धनाला प्राधान्य दिल्याने हे चित्र समोर आले आहे. गेल्या पावणेदोन वर्षांतील कोरोना साथ वन्यजीवांच्या वाढीसाठी पोषकच ठरली आहे.

स्पॉटेड डिअरला आपल्याकडे चितळ म्हणून ओळखले जाते. चितळ डिअर आणि ऍक्सिस डिअर या हरणांच्या स्थानिक उपजाती आहेत. जर्मन प्राणीतज्ञ जोहॉन ख्रिस्तेन पॉलिक्रॅप ईरेक्सबेत यांनी 1777 मध्ये चितळ ही हरणाची प्रजाती शोधून काढली. हरणाच्या 220 हून अधिक जाती आहेत. जगातील 9 टक्के हरीण ही भारतात आढळतात. सर्वोत्तम पर्यावरणीय साखळीत वाघ अन् हरीण यांचा वावर असलेले जंगल सर्वोत्तम मानले जाते. हरीण हा तृणाहारी सस्तन प्राणी आहे. समखूर म्हणून त्याची ओळख आहे, अशी माहिती वन्य जीव विभागातून देण्यात आली.

जिल्ह्याचे प्रादेशिक उपवनसंरक्षक विलास काळे म्हणाले, काही दिवसांपुर्वी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जंगलात प्रथमच स्पॉटेड डिअरची जोडी दिसून आली. त्यांचा वावर घनदाट जंगलात असल्याने आजपर्यत चितळ, हरीण दिसून आली नव्हती, पण त्यांचे अस्तित्व वन विभागाकडे नोंद होते. आता स्पॉटेड डिअर, ठिफकेदार हरीण दिसून आल्याने जिल्हÎातील पट्टेरी वाघांचा वावर स्पष्ट झाला आहे. कोरोना काळात पर्यटकांची संख्या घटल्याने, वन्यजीवांना अधिक सुरक्षितता, शांतता लाभली आहे. त्यामुळे दीड वर्षांत वन्य जीवांच्या संख्येत वाढ झाली आहे, कोल्हापूरच्या वन विभागासाठी स्पॉटेड डिअर दिसून येणे ही बाब अधिक महत्वपुर्ण आहे. याद्वो तृणहारी प्राण्यांची संख्या वाढल्याने आपोआपच पट्टेरी वाघांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कोल्हापूर : हळदी येथे मोबाईल शॉपीत चोरी

triratna

अंबाबाई मंदिर परिसर तणावमुक्त, बॉम्बच्या अफवेचा भाविकांवर परिणाम नाही

triratna

गोकुळची निवडणूक होणारच!

triratna

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात

triratna

संपूर्ण कर्जमाफीसाठी 28 ला जनआक्रोश मोर्चा

triratna

शाहूवाडी येथे थांबलेल्या ट्रकवर मोटार सायकल आदळली, जखमीचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!