तरुण भारत

मये मतदारंघात येणाऱया काळात 209 कोटींची विकासकामे

मुख्यमंत्र्यांचा मये मतदार संघ दौरा

येत्या तीन महिन्यात खाणी सुरू होणार

Advertisements

दिगंबर कामत यांच्यामुळेच खाणी बंद पडल्या

पुती गावकरांनी आपल्यावर भाष्य करू नये

डिचोली / प्रतिनिधी

   मये मतादरसंघात आतापर्यंत अनेक कामे झाली असून येणाऱया काळात विविध पातळीवर सुमारे 209 कोटींची साधनसुविधा विकास कामे हाती घेतली जाणार आहे. राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी आपले सरकार प्रथम दिवसांपासून कसोशीने प्रयत्न करीत असून राज्यातील खाणी बंद पडण्यास माजु मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच जबाबदार आहे. असा पुनरूच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी शिरगाव येथे केले.

  शिरगाव येथील श्री लईराई देवस्थान सभागृहात आयोजित दौऱयातील प्रथम बैठकीस व्यासपीठावर आणदार प्रवीण झांटय़े, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, महेश सावंत, शिरगावचे सरपंच अच्युत गावकर, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, प्रभारी प्रेमानंद म्हांंबरे, देवस्थान अध्यक्ष महादेव गावकर आदींची उपस्थिती होती.

 दिगंबर कामतमुळे खाणी बंद पडल्या

   माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी जर 2007 ते 2012 या कार्यकाळात खाण लीज नूतनीकरण केल्या असत्या तर आज राज्यातील खाणी सुरळीतपणे सुरूच राहिल्या असत्या. तसेच आज आपल्यावयर व सरकारवर आरोप करणाऱया पुती गावकर यांनी आपल्याला सल्ले देण्याची आवश्यकता नसून त्यांनी सर्वप्रथम आपल्या उदरनिर्वाचे साधन काय आहे यावर विचार करावा. नपेक्षा त्यांनी या परिस्थितीला जबाबदार असलेल्या दिगंबर काभत यांच्यावर भाष्य करावे.

 कोविडचा काळ असून यशस्वी वाटचाल

 यावषी गोवा राज्य मुक्तीचा 60 वा मुक्तीसोहळा साजरा करीत असताना गोवा राज्य हे स्वयंपूर्ण करण्यासाठी आपले लक्ष्य आहे. सर्वांनाच सरकारी नोकऱया देणे शक्मय नसून प्रत्येकाने स्वयंरोजगारासाठी स्वयंपूर्ण मित्राचे सहकार्य घ्यावे. आपण मुख्यमंत्री बनल्यानंतर जास्तसा काळ कोवीड महामारीच्या काळात गेला तरीही य सर्व संकटांवर मात करीत सरकारने आपली यशस्वी वाटचाल चालूच ठेवली आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी पुढे आपल्रा भाषणात म्हटले.

 मये मतदारसंघात 25 कोटींची कामे : झांटय़े

  आमदार प्रवीण झांटय़े यांनी, सांगितले की मये मतदरसंघात आतापर्यंत 25 कोटींची कामे झालेली असून अनेक कामे चालू आहेत. शिरगाव गावातही अनेक कामे सुरू आहेत. खाणी बंद असल्याने सरकारवर आर्थिक ताण आहे. तरीही सरकारी पातळीवरून कामे चालूच आहेत. खाणी पुढील मोसमात चालू करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेतच. मये गाव व परिसरातील गावांमध्ये असलेली धार्मिक स्थळे व इतर वापर भव यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्यासाठी आपण प्रयत्नरत असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सुविधा सुरू होण्याची गरज आहे. पर्यटनदृष्टय़ा विकास झाल्यास या भागाला रोजगारीच्या दृष्टीने चांगले माध्यम तयार होणार. असे सांगितले.

  सरपंच अच्युत गावकर यांनी स्वागत करून शिरगाव गावातील विविध समस्या यावेळी मांडल्या. सरकारच्या माध्यमातून आणि आमदार प्रवीण झांटय़े यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक कामे सुरू असून काही प्रलंबित कामे लवकर व्हावी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली.

  देवस्थान अध्यक्ष महादेव गावकर यांनी मंदिरावर विद्यूत रोषणाईचा विषय मांडला, पंचसदस्य भगवंत गावकर, माजी सरपंच विश्वंभर गावकर, बाबुसो गावकर व इतरांनी गावातील समस्या मांडल्या. त्यावर तत्काळ निदानासाठी मुख्यमंत्र्यांनी मामलेदार, उपजिल्हाधिकारी यांंना विविध सुचना केल्या.

घरांघरांमध्ये सर्व्हे करूनच सरकारी नोकऱया द्या – युवकाची मागणी.

शिरगाव येथील दौऱयावेळी गावातील एक युवक सदानंद गावकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना, सरकारी नोकऱया देत असताना संपूर्ण सर्व्हे करावी आणि ज्या घरात एकही सरकारी नोकरी नाही, किंवा ज्या घराची परिस्थिती बिकट आहे अशाच घरांमध्ये सरकारी नोकरी पोहोचणार याची काळजी घेण्याची मागणी केली. तसेच पंचायतींमध्ये स्वयंपूर्ण मित्र येतात, सरकारच्या अनेक योजनाही आहेत. त्या सर्वच गरजू व होतकरू घटकांकडे पोहोचतात की नाही, यावरही विचार करावा, असा सल्ला दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उत्तर दिले. त्याचप्रमाणे शिरगाव हे एक महत्वाचे धार्मिक स्थान असून येथे जत्रोत्सवात येणाऱया हजारोंच्या संख्येने लोकांची स्वच्छतागृहाच्या अभावी गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर स्वच्छतागृह साकारण्याची सुचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना केली.

Related Stories

आग्वाद तुरुंग नूतनीकरण उद्घाटनास पंतप्रधान येणार

Amit Kulkarni

सहकाऱयाच्या खून प्रकरणी झारखंडच्या 5 आरोपींना अटक

Patil_p

स्पंदन कला महोत्सवात कलाकारांना पुरस्कारानी सन्मानित

Patil_p

कर्ला गावातील 30 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Omkar B

रानडुकरांचा उपद्रवी घोषित करण्याचे सरकारच्या निर्णयाचे शेतकऱयाकडून स्वागत

Amit Kulkarni

जलवाहिनीसाठी खोदरलेला चर वाहनांसाठी धोकादायक

Omkar B
error: Content is protected !!