तरुण भारत

आग्रा ते राजगड गरुडझेप पायी मोहीम


छत्रपती शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका झालेल्या घटनेला ३५ वर्षे पूर्ण

३० ऑगस्टला शिवज्योतीचे कोल्हापुरात आगमन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

Advertisements

गेल्या 17 ऑगस्टपासून सुरु असलेल्या आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेअंतर्गत प्रज्वलित केल्या जाणाऱया शिवज्योतीचे सोमवारी (दि. 30) कोल्हापूरात आगमन होईल. या शिवज्योतीचे हिल रायडर्स ऍडव्हेंचर्स फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करुन ती छत्रपती शिवाजी चौकात आणली जाईल. सकाळी 10 वाजता हा शिवज्योत स्वागताचा कार्यक्रम होईल. यानंतर 31 ऑगस्ट व 1 सफ्टेंबरला शिवज्योत जिह्यातील विविध गडांवर नेऊन गडपूजन करण्यात येईल. शिवज्योतीचे ज्या ज्या मार्गावरुन प्रयाण करेल, त्या त्या मार्गात शिवकालीन युद्धकलेची प्रात्याक्षिके सादर होतील, अशी माहिती हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, 17 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राहून सुटका करुन घेतली. या प्रेरणादायी घटनेला 355 वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे स्मरण सतत रहावे यासाठी वडगाव मावळमधील गडभटकंती ग्रुपचे मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा ते राजगड गरुडझेप या पायी मोहिमेला 17 ऑगस्टपासून प्रारंभ केला होता. येत्या 29 ऑगस्टला मोहिमेची राजगडावर सांगता होईल. या मोहिमेत राज्यातील 30 तरुण मावळे सहभागी असून ते शिवरायांचे स्मरण करत आग्रा ते राजगड या दरम्यान येणाऱया चार राज्यांमधील 58 शहरांमधून 1200 किलो मीटरचे आंतर धावत धावत पूर्ण करत आहेत. मोहिमेमध्ये कोल्हापूर स्थित हिल राडयर्स फाऊंडेशनचे सदस्य सुरज ढोली हेही सहभागी आहेत. ते व त्यांच्या सोबतचे 29 मावळे राजगडावर पोहोचल्यानंतर तेथे शिवज्योत प्रज्वलित करतील. यानंतर ढोली हे शिवज्योत 30 ऑगस्टला दुपारी 4 वाजता कोल्हापूरातील ताराराणी चौकात आणतील. तेथून ही ज्योत मिरवणूकीने छत्रपती शिवाजी चौकात आणली जाईल.

ते पुढे म्हणाले, सोमवारी (दि. 31) छत्रपती शिवाजी चौकातूनच शिवज्योत भुदरगड व सामानगडावर नेली जाईल. सकाळी 10 वाजता ज्योत गडांकडे प्रयाण करेल. दोन्ही गडांवर पोहोचल्यानंतर पंचगंगा नदी, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व ताम्रपर्णी या पाच नद्यांमधील पाण्याने गडांना प्रतिकात्मक जलाभिषेक करुन त्यांचे पूजन केले जाईल. पुजनानंतर शिवकालीन युद्धकलेची प्रात्याक्षिके सादर करुन सामनागडावर वस्ती केली जाईल. मंगळवारी (दि. 1) सामनागडावरून ही ज्योत पुन्हा गडांना भेटी देण्यासाठी बाहेर आणली जाईल. तसेच नेसरीखिंड, गंधर्वगड, चंदगड, कलानिधीगड व पारगडावर ज्योत नेऊन त्यांनाही नद्यांच्या पाण्याचा प्रतिकात्मक जलाभिषेक करुन त्यांचे पूजन करण्यात येईल. यानंतर पारगडावरील नरवीर तानाजी मालुसूरे यांचा मुलगा रायबा यांच्या समाधीसह छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे जलाभिषेक करुन पूजन केले जाईल. यानंतर राजगड ते पारगड मोहिमचे सांगता केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस मोहिमेचे संयोजक विजय देवणे, ऋषिकेश केसरकर, योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्सचे संस्थापक आर. एस. पाटील, निवृत्त हवालदार संजय जांभिलकर, स्मितल जाधव व भोला यादव आदी उपस्थित होते.

Related Stories

वाळोली येथे विजेच्या धक्क्याने गंभीर वायरमनचा उपचारादरम्यान मृत्यू

Abhijeet Shinde

राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने प्रत्येकी 10,000 ची मदत देणार – विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

दूध संघासमोरील रस्त्यावर चालता डंपर पेटला

Patil_p

कोल्हापुरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; 4 जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

गोवा विधानसभा निवडणूकीची तयारी सर्व मतदारसंघात सुरू

Sumit Tambekar

बावेली रस्ता बनला अपघाताला निमंत्रण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!