तरुण भारत

पायलटला ह्रदयविकाराचा झटका; बांग्लादेशच्या विमानाचे नागपुरात लँडींग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मस्कटवरुन ढाक्याला येणाऱया बांग्लादेशातील बिमान बांग्लादेश’च्या एका विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडींग करण्यात आले आहे.

Advertisements

मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, हे विमान जेव्हा रायपूरवरुन जात होते त्यावेळी या विमानाच्या पायलटला ह्रदविकाराचा झटका आला. त्यानंतर विमानाने तात्काळ कोलकाता एटीसीला संपर्क केला. तसेच सद्य परिस्थितीची जाणीव करुन दिली. पायलटच्या तब्येतीची माहिती मिळताच कोलकाता एटीसीने समन्वय करुन विमानाचे नागपुर एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडींग करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या विमानात 126 प्रवासी होते. बांग्लादेशचे हे विमान नागपूरमध्ये सुरक्षितरित्या उतरवण्यात आले असून या विमानातील सगळे प्रवासी सध्या सुरक्षित आहेत. कोलकाता एटीसीने हजरजबाबीपणा दाखवत बांग्लादेशच्या या विमानाला नागपूरमध्ये उतरण्याची परवानगी दिली. जर ही परवानगी दिली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. विमानाचे लँडींग झाल्यानंतर कॅप्टनला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या विमानातील प्रवासी एअरपोर्टवर थांबून आहेत.

Related Stories

जिल्ह्यात एकूण २८६ पॉझिटिव्ह, शाहूवाडी सर्वाधिक ९५

triratna

देशात 21 हजार 822 नव्या बाधितांची नोंद

Patil_p

स्मृतीसमोरच मोदी म्हणाले, ‘सास भी कभी बहू थी…’

prashant_c

विहिरीतून निघाल्या दोन हजाराच्या नोटा…

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 525 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

हॉलिवूड स्टार टॉम क्रूज करणार आता अंतराळात शूटिंग

Rohan_P
error: Content is protected !!