तरुण भारत

एलआयसीकडून आनंदा मोबाईल ऍपचे सादरीकरण

वृत्तसंस्था/ मुंबई

जीवन विमा व्यवसायाला नवी गती प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जीवन विमा निगमने आनंदा मोबाईल ऍपचे नुकतेच सादरीकरण केले आहे. या ऍपच्या माध्यमातून विमा व्यवसायाचा विस्तार करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

Advertisements

एलआयसी इंडियाचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांच्या हस्ते सदरच्या नव्या मोबाईल ऍपचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक मुकेश कुमार गुप्ता, राजकुमार, सिद्धार्थ मोहंती, मिनी पाईप आणि इतर वरि÷ अधिकारी उपस्थित होते. डिजिटल व्यवहारांच्या युगात सदरच्या नव्या ऍपद्वारे विविध एलआयसी योजनांची माहिती पेपरलेस तत्वावर एजंटकडून सादर केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेल्या या ऍपद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. या ऍपच्या सादरीकरणानंतर एजंटकरता इ-टेनिंगचा कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये नव्या आनंदा मोबाईल ऍपची वैशिष्टय़े सांगण्यात आली. यावेळी बोलताना चेअरपर्सन एम. आर. कुमार म्हणाले की, आनंदा मोबाईल ऍपची निर्मिती ही जीवन विमा व्यवसायाकरीता महत्त्वाचे योगदान ठरणार आहे. या ऍपच्या माध्यमातून ग्राहक सेवा ही उत्तमपणे करता येण्याची संधी असणार आहे. आयुष्यामध्ये अनेक बदलांची शक्मयता असली तरी दोन गोष्टी जीवनामध्ये गरजेच्या आहेत त्यामध्ये एलआयसी आणि विमा यांचा समावेश असतो. ही सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्याचा यापुढे प्रयत्न होईल, अशी आशा आहे. आयटी आणि नव्या व्यवसाय विभागांचे विकसित केलेल्या ऍपबद्दल अध्यक्ष कुमार यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

त्रिटॉन कंपनीची 2100 कोटीची गुंतवणूक

Patil_p

…….. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजीची झुळूक

Patil_p

अर्थव्यवस्थेची स्थिती मजबुतीकडे….

Omkar B

व्होडाफोन-आयडियाकडून 3,354 कोटी अदा

tarunbharat

रेनॉची नवी क्वीड बाजारात

Patil_p

ग्रामीण क्षेत्रात किरकोळ खर्च 12 टक्के वाढला

Patil_p
error: Content is protected !!