तरुण भारत

क्रेडिट कार्डद्वारे खर्चाच्या प्रमाणात वाढ

कोरोना संकट, लॉकडाऊनच्या अगोदर अशी स्थिती झाली नाही – आरबीआयची माहिती कोरोना संकट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशामध्ये ग्राहकांच्या खर्चात वाढ होत असल्याची माहिती समोर आली असून यामध्ये क्रेडिट कार्डचा वाटा मोठा असल्याचे दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार सध्या ग्राहक क्रेडिट कार्डवर जेवढा खर्च करत आहेत, तेवढा खर्च कोरोना महामारी व देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याअगोदर कधीच झाला नसल्याची माहितीही समोर आली आहे.

जून 2021 च्या दरम्यान देशात क्रेडिट कार्डमधून होणारा खर्च हा वाढून 62,746 कोटी रुपयावर आला होता. हा आकडा फेबुवारी 2020 मध्ये 65,523 कोटी रुपये होता. जून 2019 मध्ये 56,928 कोटीचा खर्च राहिल्याची माहिती आरबीआयने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. दुसऱया बाजूला पेडिट कार्डमधून होणाऱया खर्चावर कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव दिसून आला. मे मध्ये क्रेडिट कार्डमार्फत खर्च घटून 52,131 कोटी रुपये राहिला होता.

दुसऱया तिमाहीत वाढीची शक्यता

आर्थिक वर्ष 2021-22  च्या दुसऱया तिमाहीमध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत क्रेडिट कार्ड खर्चात 35 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली आहे.

Related Stories

लँक्सेस इंडियाची कोरोना लढाईसाठी मदत

Patil_p

50 टक्के स्टार्टअप्सपुढे समस्यांचे जाळे

Patil_p

‘स्कूटर इंडिया लिमिटेड’ बंद करण्यास सरकारची मंजुरी

Patil_p

नफा वसुलीमुळे सेन्सेक्सची घसरण

Patil_p

जर्मन ब्रँड वोन वेल्स भारतात येणार

Patil_p

‘गुगल पे’ची अन्य देशात पैसे पाठविण्याची सुविधा लवकरच

Patil_p
error: Content is protected !!