तरुण भारत

दिल्लीत सप्टेंबरपासून शाळा गजबजणार

कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याच्या शाळांना सूचना

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

दिल्लीत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या ‘डीडीएमए’च्या बैठकीत घेण्यात आला. 1 सप्टेंबरपासून नववी ते बारावी आणि 8 सप्टेंबरपासून सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याला अनुमती देण्यात आली आहे. ‘डीडीएमए’ने नियुक्त केलेल्या तज्ञांच्या समितीने शाळा सुरू करण्याची शिफारस केली होती. तसेच शाळांना कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. दरम्यान, दिल्ली सरकारच्या सरकारी शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱयांचे लसीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच आता खासगी शाळांमधील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱयांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

दिल्लीतील शाळा उघडण्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (डीडीएमए) बैठक बोलावण्यात आली होती.  शाळा उघडण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या अहवालानंतर शुक्रवारी बैठक झाली. तज्ञ समितीचा अहवाल मिळाल्यानंतर दुसऱयाच दिवशी डीडीएमएच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत विविध पैलूंवर गंभीर चर्चा झाली. यानंतर पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ञांच्या समितीने आपल्या अहवालात 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा उघडण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती.

दिल्लीत दुसरी लाट ओसरली

दिल्लीत सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. राष्ट्रीय राजधानीत नवीन कोरोना प्रकरणांची संख्या गेल्या अनेक आठवडय़ांपासून केवळ 20 ते 50 च्या आसपास आहे. यादरम्यान, बऱयाच दिवसांपासून कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचेही आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र, तिसरी लाट पसरल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्यास शाळा पुन्हा बंद होऊ शकतात.

Related Stories

आपल्यासमोर आता गावांपर्यंत कोरोना पोहोचू न देण्याचे आवाहन : नरेंद्र मोदी

Rohan_P

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर दगडफेक

Rohan_P

हवामान बदल देखरेखीकरता इस्रो-नासाचा संयुक्त प्रकल्प

Patil_p

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला शस्त्रसाठा

Abhijeet Shinde

अमेरिकेत 12-15 वयोगटाचे लवकरच लसीकरण

Patil_p

आयएसी विक्रांतचे दुसरे सागरी परीक्षण सुरू

Patil_p
error: Content is protected !!