तरुण भारत

कॉम्प्टन, वॉनच्या विक्रमाशी रूटची बरोबरी

वृत्तसंस्था/ लीड्स

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके नोंदवण्याच्या इंग्लंडच्या विक्रमाशी कर्णधार जो रूटने पहिल्या डावात शतक झळकावत बरोबरी केली. त्याचे हे या वर्षातील सहावे कसोटी शतक आहे.

Advertisements

यापूर्वी डेनिस कॉम्प्टन (1947) व मायकेल वॉन (2002) यांनी एका वर्षात सहा शतके नोंदवली होती. भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत सलग तिसऱया कसोटीत रूटने गुरुवारी शतक (121) केले. सामन्याच्या दुसऱया दिवशी इशांत शर्माला मिडविकेटच्या दिशेने चौकार ठोकत 124 चेंडूत शतक पूर्ण केले. बुमराहने त्याला नंतर 121 धावांवर त्रिफळाचीत केले. याआधी ट्रेंट ब्रिजमधील पहिल्या कसोटीत त्याने 109 आणि लॉर्ड्सवरील दुसऱया कसोटीत नाबाद 180 धावा केल्या होत्या. मात्र या कसोटीत इंग्लंडला भारताकडून 151 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. आजवरच्या कारकिर्दीत त्याने 23 शतके नोंदवली असून माजी कर्णधार ऍलेस्टर कूकने इंग्लंडतर्फे सर्वाधिक 33 शतके नोंदवली आहेत.

यावर्षी जानेवारीत लंकेत झालेल्या दोन कसोटीत रूटने 228 व 186 जमविल्या. त्यानंतर चेन्नईत भारताविरुद्धच्या कसोटीत त्याने 218 धावांची खेळी केली होती.  या मालिकेत भारताविरुद्ध अजून दोन कसोटी असून त्यानंतर ऍशेस मालिकेतील तीन कसोटीही याच वर्षात होणार आहेत. त्यामुळे एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 9 शतके झळकवण्याचा विक्रम मागे टाकण्याची त्याला संधी आहे. 2006 मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने 9 शतकांचा विक्रम केला होता. त्याचप्रमाणे रूट  या वर्षात 1400 धावांचा टप्पा पार करण्याच्या मार्गावरही आहे.

Related Stories

पाकचे सहा क्रिकेटपटू कोव्हिड-19 ‘पॉझिटिव्ह’

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्सची ‘सिंह गर्जना’

Patil_p

ऑस्ट्रेलियातील ए लीग स्पर्धा 16 जुलैपासून

Patil_p

मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी पोग्बा, रेसफोर्ड उपलब्ध

Patil_p

डेव्हिस चषक : जर्मनी उपांत्य फेरीत

Patil_p

फुटबॉलपटूंकडून ओडिशा शासनाचे कौतुक

Patil_p
error: Content is protected !!