तरुण भारत

महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आयुक्तपदी रूदेश घाळी यांची नियुक्ती

बेळगाव / प्रतिनिधी

महापालिका आयुक्त जगदीश के. एच. महिनाभरापासून रजेवर असल्याने तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत. आयुक्तपदी केएएस श्रेणीतील डॉ. रूदेश घाळी यांची नियुक्ती नगरविकास खात्याने केली. निवडणुकीची धावपळ असल्याने शुक्रवारी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मनपा आयुक्त जगदीश के. एच. हे 26 जुलै रोजी रजेवर गेले होते. प्रारंभी 15 दिवसांची रजा जिल्हाधिकाऱयांकडे मागितली होती. मात्र जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केवळ 3 दिवसांची रजा दिली होती. पण जगदीश के. एच. तीन दिवसानंतर रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या रजेचा अर्ज नगर विकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. नगरविकास खात्याने प्रारंभी 15 दिवसांची रजा मंजूर केली होती. पण 15 दिवसांनंतरही जगदीश के. एच. हे रुजू झाले नाहीत. अखेर त्यांनी आपली बदली अन्यत्र करून घेतली आहे. याच दरम्यान महापालिका निवडणूका जाहीर झाल्याने मनपा कार्यालयाला वाली नव्हते. स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी तसेच प्रभारी सामान्य प्रशासन उपायुक्त अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे कार्यभार सोपवून महापालिकेच्या कामाचा गाडा सुरू होता. मात्र निवडणूक कालावधीत कायमस्वरूपी आयुक्त असणे बंधनकारक आहे. त्यामुळे नगरविकास खात्याने डॉ. रूदेश घाळी यांची नियुक्ती महापालिका आयुक्त पदी केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी रूदेश घाळी यांनी मनपा आयुक्त पदी रूजू झाले आहेत.

Advertisements

Related Stories

पाणीपुरवठा मंडळातील हंगामी कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार

Patil_p

फार्महाऊस फोडून सव्वालाखाच्या साहित्याची चोरी

Patil_p

वारकरी सांप्रदायाच्या भजनाने निघाली ग्रंथदिंडी

Amit Kulkarni

अधिकृत आदेश येईपर्यंत सलून उघडू नका

Patil_p

बिम्सला आणखी 11 लाखांची देणगी

Amit Kulkarni

सोमवारी जिल्हय़ात 12 नवे रुग्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!