तरुण भारत

सांगली : वांगी येथे तरसाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, दोन जखमी

वनविभागाने तरसाचा बंदोबस्त करण्याची मागणी

प्रतिनिधी / कडेगाव

Advertisements

वांगी ता.कडेगाव येथील तेलकी मळा येथे राहणाऱ्या दीपक बाबुराव दोरगे यांच्या दोन शेळ्या तरसाच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. तर दोन शेळ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी दि.२८ रोजी दुपारी पाचच्या दरम्यान घडली.

दीपक दोरगे यांनी घराजवळ शेळ्या बांधल्या होत्या. ते जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान घराजवळील ऊसामधून आलेल्या तरसाने शेळ्यांवर हल्ला केला. यावेळी शेळ्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे जवळ कोणी नसल्याने तरसाला त्या प्रतिकार करू शकल्या नाहीत. तरसाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या असून दोन जखमी झाल्या आहेत. दीपक दोरगे चारा घेऊन आल्यानंतर त्यांना तरसाने शेळ्यावर हल्ला केल्याचा प्रकार दिसून आला. दीपक दोरगे यांचे जवळपास २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दीपक दोरगे यांनी याबाबत वन विभागाशी संपर्क साधून तरसाने केलेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली. तरसाने केलेल्या हल्ल्यामुळे वाडी वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या परिसरातील तरसाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Related Stories

मिरज सिव्हिलचा अजब कारभार जिवंत व्यक्तीला केले मृत घोषित

Sumit Tambekar

जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे आठ जागा जिंकत सत्तांतर

Abhijeet Shinde

राजू शेट्टींनी पीक विमा कंपनीची बोगसगिरी आणली उघडकीस

Abhijeet Shinde

सांगली मनपा मालमत्ता नोंदणी अधिकारी पदी शेखर परब

Abhijeet Shinde

सांगली : जमीन खरेदी व्यवहारात कापड व्यवसायिकाची फसवणूक

Abhijeet Shinde

वांगीत रुग्णसंख्या शुन्य होईपर्यंत “कोविड सेंटर” सुरु ठेवा – डॉ. विश्वजित कदम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!