तरुण भारत

सातारा : रुई येथील बहिण भाऊ बेपत्ता

प्रतिनिधी / लोणंद

अंदोरी ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी ही बहीण भाऊ असणारी लहान मुले शनिवारी सकाळी १२ वाजल्यापासुन बेपत्ता झाली असुन या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध सुरु केला असुन या घटनेमुळे रुई व अंदोरी परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली अधिक माहिती अशी की अंदोरी ता खंडाळा गावच्या हद्दीमधील रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांची आशिष राणे वय ४ व ऐश्वर्या राणे वय अडीच वर्ष ही दोन लहान मुले शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे खेळयासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी प्रशांत राणे हे पत्नीसह शेतामधे गेले होते व त्याच्या घरी त्यांच्या आई होत्या,खेळायला गेलेली मुले बराच वेळ झाला तरी घरी आली नाहीत म्हणुन राणे कुटुंबियांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. तरी दोन्ही मुले सापडली नाहीत.

Advertisements

त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची माहिती लोणंद पोलीस स्टेशनला दिली, या घटनेचे गांभीर्य ओळखुन लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थाच्या सहकार्याने आशिष व ऐश्वर्याचा शोध सुरू केला आहे. घराच्या जवळून साधारणता २०० मीटर अंतरावरून कॅनॉल गेला असून महाबळेश्वर ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत शोधाशोध चालू आहे.

Related Stories

सातारा जिल्हा प्रशासनाने रुग्णांकडून आकारलेली अवाजवी रक्कम परत मिळवून दिली

Abhijeet Shinde

पथक आले पळापळा…!

Patil_p

सातारा : वाठार किरोली येथे कोरोनाचा चौथा बळी, नवे दोन रूग्ण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

साखरी तळ्यावर अतिक्रमण करणायांवर कारवाई करा

Amit Kulkarni

सातारा : ग्रामपंचायत प्रशासक कोण ? न्यायालयात ठरणार

Abhijeet Shinde

केएम शुगरच्या कामगाराचा मारहाणीत मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!