तरुण भारत

रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा 50 हजारांकडे

दिवसभरात जवळपास 47 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

गेल्या आठवडय़ापासून कोरोनाच्या रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येने 40 हजारांचा टप्पा ओलांडला असून त्याचा प्रवास आता 50 हजारांकडे सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 46 हजार 759 रुग्णांची भर पडली असून 509 जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान गेल्या 24 तासात 31 हजार 374 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी देशात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 496 जणांना जीव गमवावा लागला होता.

देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे केरळमध्ये वाढलेली विक्रमी रुग्णसंख्या हेच सांगितले जात आहे. केरळमध्ये शनिवारी एकाच दिवशी तब्बल 32 हजार 801 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर 179 जणांना जीव गमवावा लागला. केरळखालोखाल महाराष्ट्रात 4,654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशाचा विचार करता आतापर्यंत 3 कोटी 26 लाख 49 हजार 947 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या रुग्णांपैकी 4 लाख 37 हजार 370 जणांचा बळी गेला असून 3 कोटी 18 लाख 52 हजार 802 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. सध्या देशात 3 लाख 59 हजार 775 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. नवे रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. सध्या नवे रुग्ण आणि डिस्चार्ज मिळणारे रुग्ण यांच्यात जवळपास 10 ते 15 हजाराचा फरक पडलेला दिसतो.

Related Stories

बलात्कार अन् दंगलींचे प्रमाण घटले

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 86 हजारांचा टप्पा

Rohan_P

केंद्र सरकारची मोठी घोषणा,१२ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

triratna

हरियाणा-पंजाबमध्ये आजपासून भात खरेदी

Patil_p

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्मगावी रेल्वे प्रवास

Amit Kulkarni

देशात गेल्या २४ तासात ४० हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त, तर ६१७ मृत्यू

triratna
error: Content is protected !!