तरुण भारत

पीसीबी अध्यक्षपदासाठी रमीझ राजा आघाडीवर

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाक क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) अध्यक्षपदी माजी कर्णधार रमीझ राजाची निवड जवळपास निश्चित असल्याचे समजते. पुढील महिन्यात पीसीबीच्या नव्या अध्यक्षाची घोषणा अधिकृतपणे केली जाईल.

Advertisements

सोमवारी लाहोरमध्ये पीसीबीचे निवडणूक आयुक्त तसेच निवृत्त न्यायाधीश शेख अझमत सईद यांनी खास बैठक बेलाविली असून या बैठकीला पीसीबीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये पीसीबीच्या 36 व्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. पीसीबीचे विद्यमान अध्यक्ष एहसान मणी यांचा  कालावधी 13 सप्टेंबरला संपणार आहे. पीसीबीचे मानद सदस्य तसेच पंतप्रधान इम्रान खान यांनी नव्या अध्यक्षसाठी असद अली खान आणि रमीझ राजा या दोन नांवाची शिफारस पीसीबीच्या 10 सदस्यांच्या नियंत्रण मंडळाकडे केली असल्याचे समजते. 1992 साली विश्वचषक जिंकणाऱया इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाक संघामध्ये रमीझ राजाचा समावेश होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रमीझ राजाने शेवटचा झेल टिपून पाक संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

Related Stories

युक्रेनच्या टेनिसपटूवर आजीवन बंदी

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्सचा 10 गडी राखून एकतर्फी विजय

Patil_p

मँचेस्टर सिटीमध्ये डायसचा लवकरच समावेश

Patil_p

न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

बलबिर सिंग सिनियर यांना राष्ट्रीय सन्मान मिळावा

Patil_p

30 ते 50 टक्के चाहत्यांना प्रवेश निश्चित!

Patil_p
error: Content is protected !!