तरुण भारत

बॉडिफिट गराज – निरोगी व सुदृढ शरिरसंपदेचे दालन

बेळगाव

डॉ. अंकिता खरिट बालपणापासून तंदुरुस्तीचा ध्यास घेतलेली युवती. खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारी फिजिओथेरपिस्ट म्हणून केएलई रुग्णालयात कार्यरत असतानाच आपण समाजासाठी चौकटीबाहेरचं वेगळ काही करायचं असा तिने ध्यास घेतला आणि त्याचिच परिणीती म्हणजे बॉडिफिट गराज.

Advertisements

बॉडिफिट गराज बेळगावांत तिसऱया रेल्वेगेटनजीक असलेली 25 फुट उंचीची 4000 चौ. फुट व्यापलेली हवेशीर नाविन्यपूर्ण अशी एकमेव जीम (व्यायामशाळा) आहे. याचे खास वैशिष्टय़ म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने परंतु मशिनच्या वापराविना येथे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढविण्यावर भर दिला जातो. एका सशक्त उत्साहपूर्ण नवसमाजाची निर्मिती हे यामागचे ध्येय आहे.

क्रॉसफिट लेवल-2, ऍनिमल फ्लो, झुंबा, न्यूट्रिशन, ऍरोबिक्स, पीलेट्स यात तज्ञ असलेल्या डॉ. अंकिता 9 ते 70 वर्षापर्यंतच्या स्त्री – पुरुषांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देतात. तंदुरुस्तीसोबत बॉडिफिट गराज शेजारी असलेल्या डॉ. अंकिता यांच्या क्लिनिकमध्ये सांधेदुखी, पक्षाघात, स्नायू, शरिराचा त्रास, मज्जासंस्थेचे विकास यावरही उपचार केले जातात.

यंत्रविरहित व मुलभूत व सांघिक व्यायामावर भर देणारी केवळ 5 प्रशिक्षणार्थीपासून सुरु होऊन आज शंभरहून अधिक सक्रिय सभासद असलेल्या बॉडिफिट गराजचा हा प्रवास नव्या सभासदांना आकर्षित करून वाढता प्रतिसाद मिळवित आहे.

Related Stories

बालचमूंना किल्ले साकारण्याचे वेध

Amit Kulkarni

बाहेर फिरणाऱयांवर हवाई डोळय़ाची नजर

Patil_p

नेक्ससमध्ये पर्यटन दिन साजरा

Omkar B

सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने बसवराज नरवाडे सन्मानित

Patil_p

चिदंबरनगरमधील झाडे तोडल्याप्रकरणी पर्यावरणप्रेमींची निदर्शने

Patil_p

आता बेळगाव-दिल्लीसाठी 189 सीटर विमान

Amit Kulkarni
error: Content is protected !!