तरुण भारत

कपिलेश्वरी येथे युवतीचा विनयभंग हल्लाप्रकरणी युवकाला अखेर अटक

 पिडीतेची प्रकृती सुधारेपर्यंत संशयिताचा जामीन नाकारावा

प्रतिनिधी/ फोंडा

Advertisements

कपिलेश्वरी-कवळे येथे युवतीचा विनयभंग व हल्ल्यानंतर फरारी असलेला संशयित अखेर तीसऱया दिवशी घरालगतच काल शनिवारी सकाळी फेंडा पोलिसांच्या हाती लागला. ओमकरा कवळेकर (28, वरबाट-कवळे) असे त्याचे नाव आहे. तेथूनच त्याला अटक करण्यात असून तीन दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर घटना गुरूवार 26 रोजी कपिलेश्वरी येथे दुपारी 3 वा. सुमारास घडली होती.

  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवती कपिलेश्वरी कवळे येथे बसस्थानकावर थांबली असता संशयित ओमकारने तील दुचाकीवर लिफ्ट देऊ केली होती. युवतीने लिफ्ट नाकारल्यामुळे तिचा विनयभंग करण्याहेतूने तिच्यावर हल्ला करून तो घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेनंतर संशयिताने पोलिसांना दोन दिवस गुंगारा दिला. अखेर तब्बल तीन दिवसानंतर तो पोलिसांना आपल्याच घरापासून काही अंतरावरच सापडला.

   संशयिताची जामिनावर सुटका करू नये- कपिलेश्वरी ग्रामस्थ आक्रमक

  दरम्यान काल शनिवारी सायंकाळी पिडीत युवतीचे पालक व कपिलेश्वरी येथील ग्रामस्थांनी फोंडा पोलिस स्थानकावर धडक दिली. संतत्प ग्रामस्थांनी संशयिताला अटक केल्याबद्दल सुस्कारा सोडला. यावेळी बोलताना महिल्या म्हणाल्या की सदर घटनेमुळे पिडीत युवती मानसिक तणावाखाली असून जोपर्यत तीची स्थिती पुर्ववत होत नाही तोपर्यंत संशयिताला जामीनही मंजूर करू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी ग्रामस्थांच्या मागणीचीही पुष्टी जामीन अर्जावेळी जोडण्यात येणार असल्याचे आश्वासन संतत्प ग्रामस्थांना दिले आहे.

Related Stories

वेर्ला काणकाचे सरपंच मिल्टन मार्कीस यांचे निधन

Omkar B

पाऊस, बाजारपेठेत घसरलेल्या दरेमुळे झेंडू उत्पादकाना फटका

Amit Kulkarni

दूध व ऊस उत्पादकांना संघटीतपणे लढा द्यावा लागेल !

Patil_p

सांगे आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका, वॉटर कूलर

Amit Kulkarni

केजरीवालांकडून ‘पॉवर’फूल वचने

Amit Kulkarni

म्हादईप्रश्नी ‘एनएचआय’ पथक गोव्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!