तरुण भारत

रूई येथील ‘त्या’ बेपत्ता बहीण भावाचे मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडले

प्रतिनिधी / लोणंद

अंदोरी ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी ही बहीण भाऊ असणारी लहान मुले शनिवारी सकाळ १२ वाजल्यापासुन बेपत्ता झाली होती. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आल्यानंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध घेतल्यावर आज सकाळी पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या चिमुकल्याचे मृतदेह आढळून आले.

तर ऐश्वर्या हिचे चव्हाण वस्ती पिंपरे बु गावच्या हद्दीत या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह निरा उजव्या कालव्यात आढळून आला आहे. पोलिसांनी सदर दोन्ही मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून पंचनामा करून लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. अधिक तपास लोणंदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, गणेश माने हे करीत आहेत. या घटनेने रुई गावातील लोकांच्या मनातुन हळहळ व्यक्त होत आहे दोन्ही मुले काल दुपारी घरातुन बेपत्ता झाल्यावर या घटनेने खंडाळा. तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली होती.

Advertisements

Related Stories

एसटी सेनेच्या पाठपुराव्याला यश

Patil_p

प्रांत आवारातील अतिक्रमण काढण्यासाठी मास्टर प्लॅन

Patil_p

दोन हजार पन्नास

Patil_p

क्वारंटाईन कुटुंबाच्या बंद घरावर चोरटय़ांचा डल्ला

Patil_p

पोलिसांनी घेतल्या जनजागृतीसंदर्भात सभा

Omkar B

वाढीव वीज बिलाविरोधात कंदील भेट आंदोलन

datta jadhav
error: Content is protected !!