तरुण भारत

इम्युनिटी

हल्ली बातम्या आणि मालिकांसाठी टीव्ही बघायचा कंटाळाच येतो. पण बातम्या किंवा मालिकेतले प्रसंग चालू असताना रिमोटने आवाज बंद करावा आणि जाहिराती सुरू झाल्या की चालू करावा. मालिकेच्या जाहिराती पाहिल्या की कोणत्या मालिकेत काय चाललंय, गोष्ट कुठवर आलीय, ते सगळं समजतं.

इतर जाहिराती मनोरंजनात कुठे कमी पडत नाहीत. गेली दोन वर्षे तथाकथित आयुर्वेदिक औषधांच्या असंख्य जाहिराती बघितल्या. आधी कोरोनावर मात केल्याचा दावा करणाऱया जाहिराती बघून हसू यायचं. पण हल्ली तशा जाहिराती दिसत नाहीत. पण अमुक तेल फोडणीत वापरा, अमुक पावडर दुधात मिसळून प्या, अमुक औषध दिवसातून या वेळी, इतक्मया वेळा प्या आणि इम्युनिटी वाढवा अशा जाहिराती मात्र उदंड झाल्या. इम्युनिटी वाढली की कोरोनापासून रक्षण होईल असं या जाहिरातदारांचं म्हणणं असणार.

Advertisements

मला देखील इम्युनिटी वाढवून हवी. पण कोरोनापासून रक्षण करण्यासाठी नव्हे. नेते लोक असभ्य भाषेत बोलतात तेव्हा माझं बीपी वाढतं. त्यापासून संरक्षण करण्यासाठी इम्युनिटी वाढवून हवी. काही वेळा नेते विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची, स्वस्ताईची आकडेवारी सांगतात किंवा आपल्या अंगावर फेकतात. मला ती खरी वाटते. पण रोज वाढत चाललेले पेट्रोलचे भाव किंवा स्वयंपाकाच्या सिलेंडरचे भाव वाढलेलेदेखील दिसतात. शाळांच्या फिया वाढलेल्या दिसतात. मला दिसलेले आणि नेत्यांनी सांगितलेले यांचा मेळ घालता आला नाही की डोके दुखते. ते दुखू नये म्हणून इम्युनिटी वाढवून हवी आहे.

 सरकारी उद्योग आक्रसत चाललेले दिसतात. सरकारी नोकऱया कमी होत चाललेल्या दिसतात. तरी वेगवेगळे पुढारी राखीव जागा मागतात किंवा त्यांचे आश्वासन देतात. त्याची संगती लागत नाही. आपणच मूर्ख असल्याचा भास होतो. तो होऊ नये म्हणून इम्युनिटी वाढवून हवी आहे. नेते शिवराळ बोलतात. राजकीय पक्ष त्यांचे समर्थन करतात. माध्यमे त्या भाषेचे कौतुक करतात. शिवराळ नेत्यांना प्रसिद्धी देतात. यापायी मनस्ताप होऊ नये म्हणून इम्युनिटी वाढवून हवी आहे.

ती मिळणार नाही याचीही खात्री आहे. 

जाता जाता अमुक तेल डोक्मयाला लावून, तमुक टूथपेस्टने दात घासून, अलाण्या कंपनीची पादत्राणे वापरून किंवा फलाण्या कंपनीचा सदरा घालून इम्युनिटी वाढते अशी जाहिरात न केल्याबद्दल संबंधितांचे मनःपूर्वक आभार!

Related Stories

खेलत श्याम होरी

tarunbharat

सावध आणि आश्वासक सुरुवात

Patil_p

प्रत्ययेंविण बोलावें ! तेंची पाप !!

Patil_p

दंड धरी जेंवि कृतान्त

Omkar B

मन उलगडताना…

Patil_p

राजस्थानातील राजकीय वादळ: जादूगार विरुद्ध कलाकार

Patil_p
error: Content is protected !!